AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्राकाटाऊ ज्वालामुखीजवळ गेलेली स्पीडबोट बेपत्ता; 5 पत्रकारांचा शोध सुरू

अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीत काही दिवसांपूर्वीच भीषण उद्रेक झाला होता. पण या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी घेतलेली जोखीम महागात पडली. कारण पाच पत्रकारांसह 8 जण बेपत्ता झाले आहेत.

क्राकाटाऊ ज्वालामुखीजवळ गेलेली स्पीडबोट बेपत्ता; 5 पत्रकारांचा शोध सुरू
अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीजवळ गेलेली स्पीडबोट बेपत्ता; 5 पत्रकारांचा शोध सुरूImage Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 10, 2026 | 3:07 PM
Share

अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीत काही दिवसांपूर्वीच भीषण उद्रेक झाल्याची घटना घडली होती. उद्रेकानंतरही अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीमधून अजूनही स्फोट होत असून लाव्हा आणि तप्त राख बाहेर पडत आहे. त्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे या घटनेची इत्यंभूत माहिती पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असं असताना या सक्रिय ज्वालामुखीच्या उद्रेकाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेली एक स्पीडबोट सुंडा सामुद्रधुनीत बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर 5 पत्रकारांसह एकूण 8 लोक होते. बोटीमध्ये इंडोनेशियाच्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे 5 पत्रकार होते. त्यांच्यासोबत चालक दलाचे 2 सदस्य आणि 1 स्थानिक गाइड असे एकूण 8 जण होते.

7 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी बंतन प्रांतातील कारिता किनारपट्टीवरून हे सर्वजण बोटीने निघाले होते. पण संध्याकाळनंतर त्यांचा मुख्य कार्यालयाशी किंवा बोटीच्या मालकाशी कोणताही संपर्क झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नेमकं काय झालं यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. इंडोनेशियाची राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्था, स्थानिक पोलीस, लष्कर आणि मच्छिमार थर्मल ड्रोन आणि हाय-स्पीड बोटींच्या मदतीने त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, ज्वालामुखीमधून निघणारी राख, समुद्रातील उंच लाटा आणि कमी दृश्यमानता यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत आहेत.

एका पत्रकाराने सोमवार संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांना मेसेज करून ज्वालामुखीच्या जवळ पोहोचल्याचे सांगितले होते. तेव्हा ते किनाऱ्यापासून साधारण 18.5 किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर संपर्क त्यांचा तुटला. दरम्यान, या घटनेमुळे जकार्तासह अनेक शहरांवर राखेचे साम्राज्य पसरले असून अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहे. इतकंच काय तर ज्वालामुखीच्या 3 किमी परिसरात जाण्यास बंदी घातली होती.

Follow Us
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचाली...
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग
भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी...
Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना सवाल
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी जाहीर
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त