सरकारच्या वाईन धोरणाविरोधात अण्णा हजारेंचा एल्गार, आण्णांचा उपोषणाचा इशारा, सरकारची डोकेदुखी वाढणार?

| Updated on: Feb 05, 2022 | 11:22 PM

अण्णांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. त्याबाबत अण्णांनी राज्य सरकारला 3 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्राला राज्य सरकारकडून उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे अण्णांनी राज्य सरकारला एक स्मरणपत्र पाठवलं आहे. त्यात वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात बेमुदत उपोषण करण्यावर ठाम असल्याचं अण्णांनी म्हटलंय.

सरकारच्या वाईन धोरणाविरोधात अण्णा हजारेंचा एल्गार, आण्णांचा उपोषणाचा इशारा, सरकारची डोकेदुखी वाढणार?
अण्णा हजारे, उद्धव ठाकरे
Follow us on

अहमदनगर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वाईन धोरणाविरोधात राज्यात विरोधी पक्षासह अनेक सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य माणसांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपनं तर ठाकरे सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपच केला आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी ठाकरे सरकारच्या वाईन धोरणाविरोधात एल्गार पुकारलाय. किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात अण्णा हजारे यांनी आता बेमुदत उपोषण (Indefinite fasting) करण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतचं एक पत्र अण्णांनी 3 फेब्रुवारीला राज्य सरकारला पाठवलं आहे. त्या पत्राचं उत्तर न मिळाल्यानं अण्णांनी एक स्मरणपत्र पाठवून उपोषणावर ठाम असल्याचं राज्य सरकारला कळवलं आहे.

राज्यात सर्वत्र एकाच वेळी आंदोलन?

अण्णांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. त्याबाबत अण्णांनी राज्य सरकारला 3 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्राला राज्य सरकारकडून उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे अण्णांनी राज्य सरकारला एक स्मरणपत्र पाठवलं आहे. त्यात वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात बेमुदत उपोषण करण्यावर ठाम असल्याचं अण्णांनी म्हटलंय. इतकंच नाही तर राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वाईन धोरणाविरोधात आता संपूर्ण राज्यात एकाच वेळी आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा अण्णांनी ठाकरे सरकारला दिलाय.

राज्य सरकारचा निर्णय काय?

राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 27 जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणारआहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारच्या या प्रस्तावावर शिक्कामोर्तबही करण्यात आलं.

इतर बातम्या :

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

‘महाराष्ट्रात लोकशाहीचा मुडदा पाडू नका’, किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात