युक्तिवाद पूर्ण, पण कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढवलं, शिंदे गटाचा युक्तिवाद संपताच…, सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला, अखेर आज शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. आज शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी 2019 मध्ये कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारचा देखील दाखला दिला. या प्रकरणात दहाव्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नाही, शिंदेंच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही, असा युक्तिवाद यावेळी धृव मेहता यांच्याकडून करण्यात आल आहे. तसेच यावेळी युक्तिवाद करताना त्यांनी भाजप आणि शिवसेना युतीचा देखील दाखल दिला.
निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती. परंतु निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी ही युती तोडण्यात आली. ही युती तोडण्यात आल्याने पदाधिकारी नाराज झाले होते, असंही यावेळी धृव मेहता यांनी म्हटलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचच सरकार होतं. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकार वाचवण्यासाठी शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, म्हणजे हे सरकार कोसळंलच नाही, असा दावाही यावेळी धृव मेहता यांनी केला.
दरम्यान आज शिवसेना शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. मात्र त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयातत रिजॉइंडरची मागणी केली आहे. मला रिजॉइंडर द्यायचा आहे, त्यासाठी मला काही वेळ द्याल अशी मागणी कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केली आहे. दरम्यान कपिल सिब्बल हे आता पुन्हा एकदा युक्तिवाद करणार असल्याने शिवसेना शिंदे गटाची चिंता वाढली आहे. रिजॉइंडरमध्ये कपिल सिब्बल नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी सलग तीन सुनावणीमध्ये युक्तिवाद केला होता. अखेर आज त्यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे.