AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशेचे औषध देऊन एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अतिप्रसंग, नंतर धर्मांतरणाचा प्रयत्न

नागपूरात भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडीतीने आरोप केला आहे की रेप केल्यानंतर तिच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत.

नशेचे औषध देऊन एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अतिप्रसंग, नंतर धर्मांतरणाचा प्रयत्न
nagpur crime
| Updated on: Jun 16, 2026 | 9:18 PM
Share

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक २४ वर्षांची तरुणी ओरडताना दिसत आहे आणि तिचा एक जुना क्लासमेट अयाज ताज मदारे तिचा हात जबरदस्तीने पकडून आहे. मदारे कुराणचे आयते वाचून युवतीवर फूंक मारत आहे. तर महिला सतत ओरडताना दिसत आहे. पीडीतेचा आरोप केला आहे की यानंतर आपल्याला मुसलमान घोषीत केले आणि अतिप्रसंग केला.

नागपुरात एका भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्याच्या पत्नी सोबत हा निर्दयीपणा केला गेला आहे. पीडीतीने आरोप केला आहे की तिला नशेचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला आणि ब्लॅकमेल केले गेले.आणि तिच्याकडून लाखो रुपये उकळले. यानंतर धर्म बदलण्यासाठी दबाव घातला गेला. मात्र ही घटना एक वर्षांपूर्वीची आहे. परंतू पीडीतेने आता तिच्या पतीला ही घटना सांगितल्यानंतर आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मदारे आणि अमीन शेख यांना अटक केली आहे. तसेच मध्य प्रदेशातील तामिया निवासी तिसरा आरोपी हजर मौलाना याचा शोध सुरु आहे. पोलिसांच्या मते तक्रार करणारी २४ वर्षांची महिलेचे पती हे इंडियन एअर फोर्समध्ये आहेत आणि आता दुसऱ्या शहरात तैनात आहेत. पीडीता ही प्रॉपर्टी डिलिंगचे काम करते.

काय आहे पूर्ण प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी २०२५ मध्ये अयाझ यांने कथितपणे एक प्लॉट खरेदी करण्याच्या या विवाहितेशी संपर्क केला आणि तिला वर्धा रोडवरील एका हॉटेलात बोलावले. महिलेचा आरोप आहे की त्याने नशेचे पदार्थ टाकलेले ज्यूस प्यायला दिले आणि बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेचा व्हिडीओ आणि फोटोही काढले.

पीडीतेचा आरोप अनेकदा अतिप्रसंग

तक्रारीनुसार आरोपीने नंतर त्या अश्लिल व्हिडीओंचा वापर करुन वारंवार तिला ब्लॅकमेल केले. तिच्यावर वारंवार रेप केला आणि तिच्याकडून कथितपणे ३.०९ लाख रुपये वसुल केले. पीडीतीने हा देखील आरोप केला कि तिला इस्लाब कबूल करण्यास दबाव टाकला. आणि धार्मिक रिती-रिवाजाच्या नावाने तिच्याकडून अनेक कृत्ये करुन घेतली.

पीडीतीने हा देखील दावा केला की मे २०२५ मध्ये आरोपींने तिला नागपूरच्या कमलेश्वर येथे आणले, तेथे अमीन शेख आणि हजरत मौलानाशी भेट घडवली. तक्रारीनुसार या तिघांनी तिला सूनसान जागी नेले. काही  मुस्लीम धार्मिक रिजी-रिवाज केले आणि दावा केला की तिचे धर्म परिवर्तन पूर्ण केले. त्यानंतर तिने आरोप केला की तिच्या शरीरावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

सोनेगांव पोलिस स्थानकात तक्रार

पोलिसांनी सांगितले की तीन दिवसांपूर्वी तिचा पती ड्यूटीवरुन घरी आला तेव्हा त्या महिलेने या कथित घटने संदर्भात सांगितले. यानंतर सोनेगांव पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. पोलिसांनी बलात्कार, जबरीने वसुली,धर्मांतराचा प्रयत्न आणि मानव बळी आणि अन्य अमानवीय अघोरी कृत्य प्रथे आणि काळ्या जादू प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी