AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे लोक…संघाचे अतुल लिमये यांचा CJP वर गंभीर आरोप, दीपकेंचे नाव घेत…

MIDCमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून 60 ते 65 हजार पगार असलेल्या भगवानराव दीपकेंनी मुलाच्या अमेरिकेतल्या उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवला? CJP ही संस्था निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नसतानाही राजकीय पक्षासारखे काम करून निधी कसा स्वीकारू शकते? असा सवाल अमित तिवारी यांनी केला आहे.

भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे लोक...संघाचे अतुल लिमये यांचा CJP वर गंभीर आरोप, दीपकेंचे नाव घेत...
cjp and abhijeet dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2026 | 9:49 PM
Share

CJP And Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीचं जंतरमंतरवरील आंदोलन देशविरोधी असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमयेंनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात लिमये बोलत होते. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन एक केस स्टडी म्हणून अभ्यास करण्याची आणि ते डिकोड करण्याची गरज आहे. या आंदोलनाची क्रोनोलॉजी, मेथोडोलॉजी, सपोर्ट सिस्टीम आणि त्यापाठीमागची विचारधारा कोणती हे समजण्याची गरज आहे, असं मत अतुल लिमये यांनी व्यक्त केलं. तसेच अभिजीत दीपकेंच्या भारत आगमनाला आणि त्यानंतर झालेल्या दिल्लीसह इतर शहरातील आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असा दावाही त्यांनी केला.

भारत तेरे तुकडे होंगे अशी…

20 जून नंतर सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने वाढता प्रतिसाद मिळाला. या काळात असं काय झालं की या आंदोलनाचं स्वरूप बदललं? कोणती सपोर्ट सिस्टीम दीपकेच्या आंदोलनासोबत जोडली गेली हे शोधण्याची गरज आहे. CJPच्या सपोर्ट सिस्टीम मध्ये अनेक डाव्या संघटना होत्या. भारत तेरे तुकडे होंगे अशी घोषणा देणारे लोक या व्यासपीठावर का आले हे आपल्या लक्षात येतं. विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्य कारणासाठी सुरू झालं होतं, मात्र ते का भरकटलं आणि ते डाव्या संघटनांच्या नियंत्रणात का गेले हे आपल्याला समजून येतं, असा आरोपही त्यांनी केला.

मान्य नागरिकांची जी काही व्यथा…

एकीकडे संघाच्या अतुल लिमये यांनी सीजेपीवर वेगवेगळे दावे केलेले असताना दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी काम करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. तरुणांची किंवा देशातील सामान्य नागरिकांची जी काही व्यथा आणि अडचण होती, ती सरकारने समजून घेण्याचे आणि त्याची दखल घेण्याचे काम केले आहे. पंतप्रधानांनी काल देशातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संबोधित करून योग्य ती भूमिका मांडली आहे. त्यामुळे ही वेळ एकमेकांवर चिखलफेक करण्याची किंवा आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही. आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत आणि देश पुढे गेला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे, याच भावनेतून सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असं पटेल म्हणाले.

कनिष्ठ अभियंता म्हणून 60 ते 65 हजार पगार असलेल्या…

तिकडे गुजरातच्या सूरतमधील RTI कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दीपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. MIDCमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून 60 ते 65 हजार पगार असलेल्या भगवानराव दीपकेंनी मुलाच्या अमेरिकेतल्या उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवला? CJP ही संस्था निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नसतानाही राजकीय पक्षासारखे काम करून निधी कसा स्वीकारू शकते? असा सवाल अमित तिवारी यांनी केला आहे. दरम्यान, जंतरमंतरवर यशस्वी आंदोलन केल्यानंतर अभिजीत दीपकेंना काहीजण टार्गेट करु लागले आहेत. ज्या आंदोलनामुळं मोदी सरकारनं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, त्या आंदोलनालाच आता RSSच्या लिमयेंनी देशविरोधी ठरवलं आहे. त्यामुळे आता भविष्यात सीजेपी आणि दीपके यांच्याबाबत काय काय घडणार, कोणकोणते आरोप होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?