बायकांच्या पोटाला मशीन लावायचा, हळूहळू छातीकडे…भोंदुबाबा खरातच्या नव्या व्हिडिओने खळबळ!

सध्या अशोक खरात हा भोंदूबाबा चांगलाच चर्चेत आहे. अशोक खरातने एका महिलेवर बलात्कार केल्याचा सीसीटीव्ही फूटेज समोर आला होता. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक अल्पवयीन मुलगी दिसत आहे.

बायकांच्या पोटाला मशीन लावायचा, हळूहळू छातीकडे...भोंदुबाबा खरातच्या नव्या व्हिडिओने खळबळ!
अशोक खरात
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 21, 2026 | 5:31 PM

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक खरात याच्या भोंदूगिरीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याने कित्येक महिलांवर बलात्कार केले. त्यामधील एका महिलेने तक्रार केल्यानंतर अशोक खरातची काळी कृत्ये समोर आली आहेत. आता अशोक खरातचे आणखी एक लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे.

अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं

अशोक खरातचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक अल्पवयीन मुलगी दिसत आहे. यावेळी अशोक खरातने अल्पवयीन मुलीवर ‘इंटरनेट केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून फसवणूक केल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उपचाराच्या नावाखाली केलेल्या या अघोरी कृत्याने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

काय आहे व्हिडीओ?

व्हिडीओत स्पष्ट दिसते की, खरातने मुलीच्या पोटावर केबल टेस्टरचे टर्मिनल लावून ‘ऊर्जा शुद्धीकरण’ किंवा ‘तांत्रिक उपचार’ असा बनाव केला. तो मुलीला सांगत होता की, “तुझ्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो.” प्रत्यक्षात हे सर्व केबल टेस्टर आणि इतर साध्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून केलेला भोंदू प्रकार होता. तो ते टेस्टर पोटापासून थोडेवर छातीपर्यंत फिरवतो. संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून, ती आता व्हायरल होत आहे.

या प्रकारानंतर अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आधीच महिलांच्या लैंगिक शोषण, फसवणुकी आणि राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित प्रकरणात त्याला अटक झाली आहे. आता अल्पवयीन मुलीवर अंधश्रद्धेच्या नावाखाली केलेल्या या गंभीर फसवणुकीमुळे पोलिसांकडून अतिरिक्त तपास सुरू झाला आहे. विशेष तपास पथक (SIT) या नव्या व्हिडीओच्या आधारे खरातच्या इतर भोंदू कृत्यांचा शोध घेत आहे.

नाशिक पोलिसांच्या मते, खरातने अशा प्रकारे अनेक महिलांना आणि मुलींना फसवले असण्याची शक्यता आहे. “उपचाराच्या नावाखाली इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून लोकांची दिशाभूल करणे ही गंभीर अंधश्रद्धा आणि फसवणुकीची घटना आहे,” असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या व्हिडीओच्या व्हायरल होण्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी खरातला ‘भोंदूबाबा’ म्हणत त्याच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. खरातच्या काळ्या कारनाम्यांची साखळी दिवसेंदिवस लांबत चालली असून, त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून लवकरच नव्या FIR दाखल होण्याची अपेक्षा आहे.

Follow Us