Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?
ईडीने भोंदू बाबा अशोक खरातविरोधात 3000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. खरातने भक्तांची फसवणूक करून 42.88 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. यात मनी लॉन्ड्रिंग, 142 बनावट बँक खाती आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा उल्लेख आहे. ईडीने 19.20 कोटींची मालमत्ता जप्त केली असून, खरातची पत्नीही आरोपी आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

भोंदू बाबा, लिंगपिसाट अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भोंदू खरात विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केला आहे. तब्बल 3 हजार पानी आरोपपत्र आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. भोंदूबाबा खरातच्या संपत्तीचा संपूर्ण तपशीलच यात देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्याच्या पत्नीचाही यात उल्लेख करण्यात आलं आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांवरच या आरोपपत्रात अधिक फोकस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ईडीने 3 हजाराहून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. खरातने भक्तांची वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करून 42 कोटी रुपयांची माया जमवल्याचं आरोपपत्रात म्हटलं असून त्याचे पुरावेही देण्यात आले आहेत. ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले आहे. खरातने बनावट पद्धतीने 142 बँक खाती उघडली असा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे खरात याच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं सांगितलं जात आहे.
आरोपपत्रात नेमक काय?
ईडीच्या तपासात अशोक खरातच्या कथित गुन्हेगारी उत्पन्नाची रक्कम 42.88 कोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 19.20 कोटींच्या स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त, तर शोध मोहिमेदरम्यान 17.70 कोटींची रोकड, बँक ठेवी, विदेशी चलन, सोने-चांदीचे दागिने आणि मर्सिडीज कार जप्त करण्यात आली आहे.
खरात यांचे सहकारी अरविंद बावाके यांनी 18 ते 20 कोटींच्या रोख व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
एका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारे यांनी 34 बेनामी खाती उघडण्यास मदत करून व्यवहार लपवल्याचा आरोप तपासात समोर आलं आहे.
तपासात काही बँक व्यवस्थापकांनी केवायसी नियमांचे उल्लंघन करून बेनामी खाती उघडणे, रोख रक्कम जमा आणि काढण्यास मदत केल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही कथित बेकायदेशीर निधीतून खरेदी केलेल्या मालमत्ता स्वतःच्या नावावर नोंदवून मनी लॉन्डरिंगला मदत केल्याचा आरोप आहे.
सरकारवाडा, शिर्डी, सिन्नर आणि राहाता पोलिस ठाण्यांमध्ये दाखल फसवणूक, खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यांवरून ईडीकडून मनी लॉन्डरिंगचा तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
लिंगपिसाट खरातने मंत्रतंत्राच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे येणाऱ्या महिलांच्या कमजोरीचा गैरफायदा घेऊन त्याने महिलांचं लैंगिक शोषण केलं. लैंगिक शोषणाचा शिकार झालेल्या महिला असंख्य आहेत. त्याचे महिलांसोबत लैंगिक चाळे करतानाचे व्हिडीओही समोर आले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यामुळे खरातला पोलिसांनी अटक केली होती. त्यातच खरातचे आर्थिक व्यवहारही समोर आल्याने आणि त्याची वाढलेली संपत्ती चर्चेचा विषय झाल्याने ईडीने या प्रकरणात कारवाई केली असता त्याच्याकडे 42 कोटीची मालमत्ता सापडली आहे. ईडीने त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा कसून तपास करून अखेर त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.