मोठी बातमी! अशोक खरात रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या बँक खात्याचा नॉमिनी? नव्या कारनाम्याने मोठी खळबळ

अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. धक्कादायक माहिती समोर आली असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात हा शेकडो बँक खात्याचा नॉमीनी असल्याचं समोर आलं आहे.

मोठी बातमी! अशोक खरात रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या बँक खात्याचा नॉमिनी? नव्या कारनाम्याने मोठी खळबळ
ashok kharat
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 02, 2026 | 3:33 PM

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातविरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केली होती, या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. एटीएसच्या चौकशीमध्ये आतापर्यंत अशोक खरात याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. अशोक खरात याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यातील काही गुन्हे हे महिलांवर अत्याचार प्रकरणात दाखल करण्यात आले आहेत, तर काही गुन्हे हे फसवणूक प्रकरणात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान आता अशोक खरातबद्दल आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे.

अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आहे. अशोक खरात याने अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन मोठा कारनामा केला आहे. काही पतसंस्था आणि समता पतसंस्थेत उघडण्यात आलेल्या शेकडो बँक खात्याचा खरात नॉमिनी असल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावाने देखील एक बँक खातं आहे, त्याचाही अशोक खरात हा नॉमिनी असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.  या सर्व खात्यांच्या माध्यमातून अशोक खरात याने आतापर्यंत स्वत:च तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकचे आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरात हा स्वत:च हे सर्व बँक खाती हातळत होता. त्याने या बँक खात्याच्या माध्यमातून जवळपास 100 कोटी रुपयांहून अधिकचे आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. कळस म्हणजे ज्या खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी आहे, त्या सर्व खात्यांना अशोक खरात याचाच मोबाईल नंबर लिंक आहे. दरम्यान या प्रकरणात आता दोन पतसंस्थेच्या चेअरमन आणि मॅनेरजची एसआयटीने चौकशी केली आहे.

अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले होते. या फोटोंमुळे चाकणकर या चांगल्याच अडचणीत सापडल्या, अखेर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दरम्यान त्यानंतर आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने असलेल्या बँक अकाऊंटचा खरात नॉमिनी असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Follow Us