भोंदू अशोक खरात याच्याबद्दल महाराष्ट्राला हादरवणारी माहिती पुढे, थेट 132 खाते..

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे. त्यामध्येच खरातने पतसंस्थांमध्ये खाते उघडून मोठे घोटाळे केल्याची माहिती मिळत आहे. काही संशयास्पद व्यवहार झाल्याचीही माहिती तपासात मिळत आहे.

भोंदू अशोक खरात याच्याबद्दल महाराष्ट्राला हादरवणारी माहिती पुढे, थेट 132 खाते..
Ashok Kharat
| Updated on: Apr 05, 2026 | 10:00 AM

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून भोंदू महिलांचे लैगिंग शोषण करत. धक्कादायक व्हिडीओही पुढे आली. अनेक मंत्र्यांसोबत त्याचे जवळचे संबंध होते. हवाला रॅकेट हा भोंदू चालवत असल्याची माहिती मिळत होती. अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन खरात याची चाैकशी पोलिसांनी केली. मात्र, आता तो देखील फरार झाला. त्याचा फोन नॉटरिचेबल येत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. करोडो रूपयाचा व्यवहार त्याने केल्याचे कळत आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनेकांची चाैकळी केली. भोंदू अशोक खरात याच्या शिर्डी जमिन फसवणूक प्रकरणात मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. भोंदू अशोक खरात याचे एका मागून एक काळे कारनामे पुढे येत आहेत.

समता आणि जगदंब पतसंस्थेत मिळून भोंदूचे एकुण 132 खाते असल्याची खळबळ उडवणारी माहिती पुढे आली. आतापर्यंत 10 ते 11 खातेदारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. नामकर्ण आवारे, रमेश हिंगे, समता आणि जगदंब पतसंस्थेचे मॅनेजर यांचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. भोंदू खरातचे शिर्डी येथील राहाता परिसरात आणखी तीन पतसंस्थेत खाते असल्याची माहिती पुढे आलीये.

सिन्नरच्या जगदंब पतसंस्थेत भोंदू अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे उघड झाली. एकाच व्यक्तीने तब्बल 32 खाती उघडल्याचा पोलिस तपासात खुलासा झाला. पावणेतीन कोटींची उलाढाल; संशयास्पद व्यवहारांमुळे खळबळ उडाली. 2024 मध्ये सर्व रक्कम काढून घेतल्याची माहितीही पुढे येत आहे. इतरांच्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा पोलिसांना संशय आहे.

पतसंस्थेच्या व्यवस्थापक अविनाश कांडेकरचा सविस्तर जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. जमीन फसवणूक प्रकरणानंतर आता आर्थिक व्यवहारांची चौकशी तीव्र होणार हे यावरून स्पष्ट दिसत आहे. अजून किती लोक या जाळ्यात अडकले ? पोलिसांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांना आर्थिक बाजूने अजून मोठा तपास करायचा आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात जमीन खरेदी विक्री एजंट ही एसआयटीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us