AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अशोक खरात याची केस लढण्यास सरकारी वकिलांचा नकार, थेट..

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. एका मागून एक खरातचे कारनामे पुढे येताना दिसत आहेत. खरातची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. एसआयटीकडून काही दिवसांपासून खरातची चाैकशी केली जात होती.

मोठी बातमी! अशोक खरात याची केस लढण्यास सरकारी वकिलांचा नकार, थेट..
Ashok Kharat case
| Updated on: Apr 01, 2026 | 11:52 AM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. हजारोंच्या घरात महिलांचा त्याने लैगिंक अत्याचार केला. काही गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आली. अशोक खरात याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने खळबळ उडाली. अनेक संसार उद्धवस्थ होण्याच्या परिस्थितीत आहेत. अनेक वर्षांपासून हा खरात महिलांवर अत्याचार करत. हेच नाही तर राजकीय लोकांचा हात असल्याने त्याला कोणीही धक्का लावू शकत नव्हते. भोंदू अशोक खरात याचे पाय धुताना रूपाली चाकणकर दिल्यानंतर खळबळ उडाली. रूपाली चाकणकर यांच्या हे प्रकरण इतके जास्त अंगलट आले की, त्यांना राज्य महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. भोंदू अशोक खरात याने लोकांना धमकावून, भीती घालून त्यांच्या जमिनी बळकावल्या. खरातकडे काही फोन होते, त्यात तो महिलांचे नंबर वेगवेगळ्या नावाने सेव्ह करत असल्याची माहिती पुढे येतंय.

खरात गेल्या काही दिवसांपासून कोठडीत आहे. एसआयटीकडून अशोक खरात याची चाैकशी केली जात आहे. नाशिक पोलिसांनी रात्री उशिरा घरात याच्या मुलाला अटक केली. अशोक खरात याची पत्नी फरार असल्याची माहित मिळत आहे. खरातच्या मुलीच्या नावावरही काही फ्लॅट असल्याची माहिती मिळतंय.

नुकताच कोर्टाने भोंदू खरातला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अखेर भोंदू खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यादरम्यानच सरकारी वकील अजय मिसर यांनी भोंदू अशोक खरातची केस लढवण्यास असमर्थता दर्शवली होती. SIT ने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती.

मात्र, सरकारी वकील ॲड अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला. 2011 मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगत स्पष्ट शब्दात ही केस चालवण्याकरिता नकार दिला.

ॲड अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनीच कोर्टात युक्तिवाद केला. भोंदू अशोक खरात याची केस चालवण्यास सरकारी वकिलांनी थेट नकार दिल्याने मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आता एसआयटीकडून कोणाला केस चालवण्याकरिता पत्र दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...