Nana Patekar : माझा जिवाभावाचा मित्र…’; नाना पाटेकरांच्या निधनाने अशोक सराफ भावुक, जुन्या आठवणी सांगितल्या
नाना पाटेकरांच्या निधनाने अशोक सराफ भावुक झाले. त्यांनी माध्यमांशी बोलताना जुन्या आठवणी सांगितल्या. या आठवणी सांगताना अशोक सराफ यांना अश्रू अनावर झाले.

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. नाना पाटेकर यांचे पूत्र मल्हार पाटेकर यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाटेकर यांनी आज गुरुवारी 5.20 वाजता गोव्यातील मणिपाल रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. नाना पाटेकर यांची अशोक सराफ यांच्यासोबत चांगली मैत्री होती. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी पाटेकरांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अशोक सराफ यांनी एका प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सराफ यांनी बातमी ऐकूण धक्काच बसला. सराफ म्हणाले, ‘सर्वात वाईट गोष्ट आहे. मला यावर विश्वास ठेवता येणार नाही. माझा अत्यंत जवळचा मित्र होता. माझी आणि त्याची एकत्र सुरुवात झाली. आम्ही एकत्र नाटक केलं होतं. त्याने ते नाटक केल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. त्याच्याविषयी.. काय काय सांगणार…मागील काही दिवसांपासून त्यांच्यासोबत बोलणं झालेलं नाही. बरेच दिवस झाले, त्याची भेट झाली नव्हती. परंतु आम्ही चांगले मित्र होतो. त्याचं निधन हे अत्यंत दु:खद आहे. मला अजूनही विश्वास होत नाही. इतक्या ताकदीचा माणूस, शारिरीक, मानसिकरित्या मजबूत माणूस गेला. माझ्या जिवाभावाचा मित्र गमावला. हे दु:ख कायम राहील’.
नाना पाटेकर आतून अंत्यत कोमल होता – अशोक सराफ
‘आमची मैत्री खूप वेगळी होती. इतकी चांगली होती की, त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तो माझी मालीश करायचा. हातपाय दाबयाचा. त्यावेळी मी खिशात दोन रुपये टाकायचो. नंतर तो मुकाट्याने पुढे जायचा. त्याने कधी स्वत:चा स्टेटस दाखवला नाही. तो इतका मोठा झाला, तरी त्याचा मोठेपणा दाखवला नाही. त्याची ती वृत्ती कमी झाली नाही. भावापेक्षा मित्र गमावाल. बाहेरून रागीट दिसणारा, पण आतून अत्यंत कोमल असा माणूस होता, असे सराफ यांनी पुढे सांगितले.