अश्विनी बिद्रे हत्या : आरोपींना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

रायगड : पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अलिबाग कोर्टात सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांतर्फे अनेक प्रकारचा युक्तीवाद करण्यात आला. पण कोर्टाने कोणत्याही बाबतीत आरोपींना दिलासा दिला नाही. चार आरोपींपैकी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्या जामीन अर्जावर आरोपीच्या वकिलांनी पुढील तारीख मागितली, पण कोर्टाने तारीख देण्यास नकार दिला. परिणामी आरोपीच्या वकिलांवर जामीन अर्ज मागे घेण्याची […]

अश्विनी बिद्रे हत्या : आरोपींना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार
Follow us on

रायगड : पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अलिबाग कोर्टात सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांतर्फे अनेक प्रकारचा युक्तीवाद करण्यात आला. पण कोर्टाने कोणत्याही बाबतीत आरोपींना दिलासा दिला नाही. चार आरोपींपैकी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्या जामीन अर्जावर आरोपीच्या वकिलांनी पुढील तारीख मागितली, पण कोर्टाने तारीख देण्यास नकार दिला. परिणामी आरोपीच्या वकिलांवर जामीन अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढावली.

मृत अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी अश्विनी यांच्या वस्तूच्या डीएनए खाजगी लॅबकडून टेस्ट करून घ्याव्या, अशी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे  पनवेल कोर्टाने त्या वस्तू खाजगी लॅबकडे वर्ग केल्या. परंतु आज आरोपींच्या वकिलांनी खाजगी लॅबच्या तपासणीस विरोधाचा अर्ज सादर केला. पण न्यायालयाने तो अर्जही रद्द केला.

आरोपी अभय कुरुदंकर आणि इतर सर्व चारही आरोपींना एकाच तुरुगांत ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून पुढील सुनावणीत त्यावर सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकून निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारी वकील संतोष पवार यांनी सांगितलं.

अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात मृत अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांच्यासह तपास अधिकारी एसीपी अजय कदम, आरोपी कुंदन भडांरी आणि अभय कुरुंदकर यांची पत्नी आणि मुलगा तसेच महेश पणशीकर या आरोपींचे नातेवाईक उपस्थित होते.