नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या महिल्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आणि डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या महिल्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर
| Updated on: Dec 13, 2022 | 10:35 PM

नाशिक : राष्ट्रवादीच्या नेत्या डॉक्टर प्राची पवार (Dr. Prachi Pawar ) यांच्यावर अज्ञात लोकांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला.प्राची पवार या माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी नेते वसंत पवार यांची कन्या आहे.प्राची पवार यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. (Attack on NCP leader dr prachi pawar in nashik)

प्राची पवार यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.