मोठी बातमी! धनंजय मुंडे भाजपात प्रवेश करणार? जवळच्या माणसाचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकारणात होणार मोठी उलथा-पालथ?
मोठी बातमी समोर येत आहे, माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वारंट निघाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे, धनंजय मुंडे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं अटक वॉरंट काढलं आहे. माणिकराव कोकाटे यांना त्यामुळे कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे त्याचवेळी आता धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद या अटक वॉरंटमुळे धोक्यात आलं आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धनंजय मुंडे यांना मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच करुणा मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे हे लवकर भाजपमध्ये प्रवेश करतील असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?
माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाल्यानंतर ते दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे माझा देखील लढा सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे हे लवकरच भाजपमध्ये जातील असं वाटत आहे. धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप आहेत, वाल्मिक कराड प्रकरणामध्ये सुद्धा त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते दिल्लीमध्ये गेले आहेत, असं मला वाटतं आहे. वाल्मिक कराड याला बाहेर काढण्यासाठी आणि या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे हे दिल्लीला गेले आहेत. मी देखील शनिवारी याबाबत पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यामध्ये 50 पक्षांना मी आवाहन करणार आहे की त्यांनी या लढ्यामध्ये मला साथ द्यावी, असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
कोकाटेंच्या अडचणी वाढल्या
दरम्यान दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यांच्याविरोधात न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे, त्यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून हाय कोर्टात देखील धाव घेतली होती, मात्र या प्रकरणावर कोर्टानं तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे, त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे.
