मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्यावर हल्ला, तरुण आला अन्…

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर हल्ला करण्यात आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्यावर हल्ला, तरुण आला अन्...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2025 | 9:39 PM

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. याच वेळी एका तरुणाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्याने या तरुणाने अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. मात्र या तरुणाने हल्ला का केला? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. याच वेळी एका तरुणाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोर तरुणाला मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर मालपाणी लॉन्स बाहेर खताळ समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.

या हल्ल्यामुळे आता ऐन गणेशोत्स काळात संगमनेरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हा तरुण खताळ यांच्याशी हात मिळवण्याचा बाहाणा करत पुढे आला आणि त्याने खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुरक्षरक्षकांनी या तरुणाला वेळीच ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या हल्ल्यानंतर खताळ समर्थकांनी लॉन्सबाहेर गर्दी केली होती.

दरम्यान या हल्ल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांकडून निषेध करण्यात आला आहे, या भ्याड हल्ल्याचा निषेध, हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत आहेत? यासंदर्भात पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत,  भ्याड हल्ले करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असा काहींचा गैरसमज आहे,  हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.  काही लोकांनी लोकशाहीचा कौल मान्य केला पाहिजे, त्यांना लोकशाही मान्य नसेल आणि ठोकशाही मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.