धक्कादायक! विशाळगडावर 25 किलो मासं घेऊन जाण्याचा प्रयत्न,नेमकं काय घडलं?

विशाळगडवर मांसाहार शिजवण्यास बंदी आहे. परंतु तरीदेखील या गडावर 25 किलोपेक्षा जास्त मास घेऊन नेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार समोर येताच शिवभक्तांनी युवकाला चांगला चोप दिला.

धक्कादायक! विशाळगडावर 25 किलो मासं घेऊन जाण्याचा प्रयत्न,नेमकं काय घडलं?
vishalgad fort meat news
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 9:11 AM

Vishalgad Fort News: राज्यात किल्ले, गडांचा मोठा आणि समृद्ध इतिहास आहे. हा वारसा जपण्यासाठी शासकीय तसेच संस्थात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात काम केले जातेय. गड-कल्ल्यांचे सरक्षण व्हावे यासाठी सरकारने मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे. सोबतच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो. गड-किल्ले फिरताना पर्यटकांनी राज्याचा इतिहास समजून घ्या. आपली वैभवशाली परंपरा जाणून घ्यावी, असे नेहमी आवाहन केले जाते. परंतु याच किल्ल्यांचं पावित्र्य नष्ट करण्याचा अनेकदा प्रयत्न होतो. पार्टी, दंगा, महिलांशी छेडछाड करण्याचे प्रकार राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर झालेले आहेत. दरम्यान, सध्या तर अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशाळगडावर तब्बल 25 किलो मांस घेऊन जाण्याचा प्रयत्न झालाय. शिवभक्तांनी हा प्रकार समोर आणला असून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आता या प्रकाराची कसून चौकशी करावी, अशी मागणी केली जातेय.

विशाळगडावर 25 किलो मांस

मिळालेल्या माहितीनुसार विशाळगडवर मांसाहार शिजवण्यास बंदी आहे. परंतु तरीदेखील या गडावर 25 किलोपेक्षा जास्त मास घेऊन नेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार समोर येताच शिवभक्तांनी युवकाला चांगला चोप दिला. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत हे मांस विशाळगडवर नेले जात होते. विशाळगडावर असणाऱ्या काही नागरिकांकडून सर्रासपणे मांस शिजवले जात असल्याचा आरोप या शिवभक्तांनी केलाय. शिवभक्तांनी पकडलेले मास पोलिसांनी दरीत फेकून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही या शिवभक्तांनी केलाय.

Loading...

अनेक प्रश्न उपस्थित

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. विशाळगडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मांस का नेले जात होते. बंदी असतानाही मांस शिजवण्याचा प्रकार करण्यात आल्याने प्रशासन कारवाई करणार का? असे प्रकार दिवसाढवळ्या होत असतील तर या भागातील प्रशासन, पोलीस नेमकं काय करत आहेत, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या कथित घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली जातेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us