VIDEO | शेतीच्या वादातून राडा, दोन गटात तुफान हाणामारी, लाठ्या-काठ्यांसह दगड-विटांनी मारहाण

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा गावात ही घटना घडली (Aurangabad groups fight agriculture land)

VIDEO | शेतीच्या वादातून राडा, दोन गटात तुफान हाणामारी, लाठ्या-काठ्यांसह दगड-विटांनी मारहाण
औरंगाबादेत तुफान राडा
| Updated on: May 04, 2021 | 10:43 AM

औरंगाबाद : शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. लाठ्या-काठ्यांसह दगड आणि विटांनी दोन गटांनी एकमेकांना मारहाण केली. औरंगाबादमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Aurangabad two groups fight over agriculture land)

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा गावात ही घटना घडली. भावकीच्या लोकांमध्ये अनेक दिवसांपासून शेतीचा वाद सुरु होता. त्याचं रुपांतर तुफान हाणामारीमध्ये झालं. दोन्ही गटातील लोकांनी लाठ्या काठ्या आणि दगड-विटांनी मारहाण केली.

मारहाणीत दोन्ही बाजूचे तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ :

कोल्हापुरात रिक्षा प्रवाशांच्या पळवापळवीवरुन राडा

कोल्हापुरात दोन रिक्षा चालक भर रस्त्यातच एकमेकांना भिडले होते. प्रवासी मिळवण्याच्या स्पर्धेतून रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली होती. त्यामुळे रस्त्यातच बघ्यांचीही गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.

कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हा प्रकार घडला होता. प्रवासी मिळवण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये होणारी भांडणं नवीन नाहीत. कोल्हापुरातही दोघा रिक्षाचालकांमध्ये असाच वाद रंगताना दिसला. मात्र सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादावादीचं रुपांतर अचानक तुंबळ हाणामारीत झालं.

दोघे रिक्षाचालक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यानंतर काही काळ रिक्षाचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली पाहायला मिळाली. मात्र इतर रिक्षाचालक आणि प्रवाशांनी दोघांच्या वादात हस्तक्षेप केला आणि दोघांना दूर केलं. या घटनेचा व्हिडीओ बघ्यांनी कॅमेरात कैद केला होता.

संबंधित बातम्या :

VIDEO | प्रवाशांच्या पळवापळवीने वाद, कोल्हापुरात रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी

VIDEO | ट्राफिक जॅममुळे बाचाबाची, नगराध्यक्षांनी कानाखाली पेटवल्याने भररस्त्यात हाणामारी

(Aurangabad two groups fight over agriculture land)