Aurangabad Gold: सोन्यानं झटकली मरगळ, दरात काहीशी वाढ, वाचा औरंगाबादचे दर काय?

| Updated on: Oct 01, 2021 | 6:30 PM

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून उतरणीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोन्याच्या दरांमुळे सर्वांचेच लक्ष सराफा बाजाराकडे (Aurangabad sarafa market) लागले होते. त्यातच काल चांदीनेही आठ महिन्यांतील विक्रमी निचांक गाठला होता. आता सोन्या-चांदीचे (Gold-Silver rate) दर आणखी किती खोल पातळी गाठतात, याची सर्वांना चिंता लागली होती. मात्र आज शुक्रवारी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात (Gold Price) काहीशी […]

Aurangabad Gold: सोन्यानं झटकली मरगळ, दरात काहीशी वाढ, वाचा औरंगाबादचे दर काय?
गोल्ड स्कीम
Follow us on

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून उतरणीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोन्याच्या दरांमुळे सर्वांचेच लक्ष सराफा बाजाराकडे (Aurangabad sarafa market) लागले होते. त्यातच काल चांदीनेही आठ महिन्यांतील विक्रमी निचांक गाठला होता. आता सोन्या-चांदीचे (Gold-Silver rate) दर आणखी किती खोल पातळी गाठतात, याची सर्वांना चिंता लागली होती. मात्र आज शुक्रवारी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात (Gold Price) काहीशी वाढ झालेली दिसून आली.

औरंगाबादमधील दर काय?

आज औरंगाबादच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 46,250 रुपये प्रति तोळा असे नोंदले गेले. काल सोन्याच्या दरांनी 46 हजारांची पातळी सोडली होती. गुरुवारी सोन्याचे दर 45,700 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले होते. तर चांदीनेही आठ महिन्यांतील निचांकी पातळी गाठली होती. काल एक किलो शुद्ध चांदीचे दर 62800 रुपये प्रति किलो एवढे होते. मात्र आज चांदीच्या दरातही थोडीशी वाढ होऊन हे दर 63,000 रुपये प्रति किलो एवढे नोंदले गेले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील घसरणीच्या दिशेने चाललेला सोन्याच्या दरांच्या मालिकेत खंड पडला असून सोन्याच्या दरांनी मरगळ झटकल्याचे चित्र आहे.

ऑनलाइन सोने खरेदीचा ट्रेंड

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. आतापर्यंत सोने खरेदीचे काम किरकोळ दुकानांद्वारे केले जात आहे. कोरोनामुळे ऑनलाईन सोने खरेदी आणि विक्रीला चालना मिळाली आणि गुंतवणुकीचे मूल्य 100 रुपयांपेक्षा जास्त वाढले. पीसी ज्वेलर्स, कल्याण ज्वेलर्स, तनिष्क, सेन्को गोल्ड आणि डायमंड सारख्या ब्रॅण्ड्सने ऑनलाईन दागिन्यांची विक्री सुरू केली. यामध्ये खरेदीदार किमान 100 रुपयांचे सोने खरेदी करू शकतो. जेव्हा तो 1 ग्रॅम इतके सोने खरेदी करतो, तेव्हा तो त्याची डिलिव्हरी देखील घेऊ शकतो.

या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन खरेदीची सुविधा

वरील सर्व ब्रँड्सनी त्यांच्या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करून दिलीय. याशिवाय ऑगमाँट गोल्ड फॉर ऑल, सेफ गोल्ड सारख्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन सोने खरेदी केले जाऊ शकते. आता आपल्या देशात उत्सवाचा हंगाम सुरू होत आहे. सणासुदीच्या काळात सोन्याला प्रचंड मागणी असते. नवीन ट्रेंडमध्ये ऑनलाईन सोन्याच्या खरेदीलाही गती मिळत आहे.

बहुतेक तरुण ऑनलाईन सोने खरेदी करतायत

ब्लूमबर्गच्या एका अहवालात, कल्याण ज्वेलर्सचे रमेश कल्याण रमण यांनी सांगितले की, तरुणांमध्ये गुंतवणुकीबाबत खूप दक्षता घेण्यात आलीय. ऑनलाईन सोने खरेदी करणारे बहुतेक तरुण आहेत. ते दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोने विकत घेत आहेत. 2019 च्या अहवालानुसार, ज्वेलर्सच्या वेबसाईटच्या मदतीने ऑनलाईन ज्वेलरी मार्केट एकूण मार्केटच्या 2 टक्के आहे.

इतर बातम्या- 

Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचे दरही वाढले; पटापट तपासा किंमत

Gold price: सोने सप्टेंबर महिन्यातील निचांकी पातळीवर; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?