महानायक अमिताभ बच्चन आता जालन्यातील कंपनीचे ब्रँड अँबेसेडर, लोखंडी सळ्यांसाठी आयकॉन स्टीलची ख्याती

| Updated on: Oct 15, 2021 | 12:18 PM

औरंगाबाद: स्टील उत्पादनात अग्रेसर असलेल्या जालना येथील आयकॉन स्टील (Icon Steel, Jalna) कंपनीच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh bacchan) हे आयकॉन स्टीलचे ब्रँड अँबेसेडर बनले आहेत. कंपनीसोबत या संबंधीचा करार नुकताच पार पडला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी आणि अमिताभ बच्चन यांच्यात हा करार झाला आहे. कंपनीची […]

महानायक अमिताभ बच्चन आता जालन्यातील कंपनीचे ब्रँड अँबेसेडर, लोखंडी सळ्यांसाठी आयकॉन स्टीलची ख्याती
अमिताभ बच्चन जालन्यातील आयकॉन स्टील कंपनीचे ब्रँड अँबेसेडर
Follow us on

औरंगाबाद: स्टील उत्पादनात अग्रेसर असलेल्या जालना येथील आयकॉन स्टील (Icon Steel, Jalna) कंपनीच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh bacchan) हे आयकॉन स्टीलचे ब्रँड अँबेसेडर बनले आहेत. कंपनीसोबत या संबंधीचा करार नुकताच पार पडला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी आणि अमिताभ बच्चन यांच्यात हा करार झाला आहे.

कंपनीची विश्वासार्हता वाढेल- दिनेश राठी

अमिताभ बच्चन यांच्याशी प्रचार व प्रसारासंबंधी करार झाल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक दिनेश राठी म्हणाले की, बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट यांच्याकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयकॉन स्टीलच्या उच्च दर्जाची साक्ष देतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन हे आयकॉन स्टीलचे ब्रँड अँबेसेडर झाल्याने आयकॉन स्टीलच्या उत्पादनांना अधिक विश्वासार्हता मिळाली आहे. यासोबतच संपूर्ण भारतभर कंपनी नेटवर्कच्या विस्ताराला मदत होणार असल्याचे राठी यांनी सांगितले.

बांधकामाच्या लोखंडी सळयांसाठी देशात लौकिक

बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्यांच्या उत्पादनात आयकॉन स्टीलचा देशभरात नावलौकिक आहे. या कंपनीने आपल्या उच्च दर्जाच्या उत्पादनाच्या बळावर बांधकाम क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. गेल्या तीस वर्षांपासून स्टील बार उत्पादनात नव-नवे संशोधन करून आयकॉल स्टीलकडून सळ्यांची निर्मिती केली जात आहे. बांधकाम क्षेत्रात अधिक सरस कामगिरी करणाऱ्या आयकॉन स्टीलने आप ल्या संशोधनातून गुणवत्ता आणि मागणी या दोन्हींचे उत्तम संतुलन साधत डीएस प्रणालीने उच्च गुणवत्ता आणि दर्जा राखून बांधकाम क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होत नसल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील अभियंता, ठेकेदार तसेच लोकांचा कल आता आयकॉन स्टीलच्या डीएस सळई वापराकडे वाढल्याचा दावा, व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे.

ऑडी क्यू-5 ची निर्मिती औरंगाबादेत सुरू

जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी ऑडी’ने एकदम नव्या कोऱ्या क्यू- 5 फेसलिफ्ट एसयूव्ही मॉडेलची औरंगाबादच्या प्रकल्पात निर्मिती सुरू केली आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरुप्रताप बोपाराय (Gurupratap Boparay) आणि ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग ढिल्लन (Balbeersingh Dhillan) यांनी नुकतेच एका कार्यक्रमात क्यू-5 चे अनावरण केले. गेल्या वर्षी कंपनीने या वाहनाचे उत्पादन थांबवले होते. भारत सरकारने बीएस- 6 चे नियम लागू केल्यावर कंपनीने गेल्या वर्षी या कारचे उत्पादन थांबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या रूपात क्यू-5 भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ही आलिशान गाडी विक्रीसाठी उपलब्ध होईल.

इतर बातम्या-

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार

औरंगाबाद: गुंठेवारीची मालमत्ता नियमित करा, अन्यथा १ नोव्हेंबरनंतर बुलडोझर चालणार, मनपाचा इशारा