औरंगाबादेत जखमी अवस्थेतील दुसऱ्याही बिबट्याने घेतला अखेरचा श्वास ; वन्यप्रेमींमध्ये हळहळ

वनविभागातील कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे प्राण वाचवण्यासाठी तीन डॉक्टरांचे पथक व रेस्क्यू टीम यांना पाचारण करून उपचाराची साधने, औषधे, oxygen सिलेंडर व इतर सर्व आवश्यक सुविधांची उपलब्ध करून औरंगाबाद व गुजरात येथील डॉक्टरांशी संपर्क साधून वन्यप्राणी बिबट्याचे प्राण वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले होते.

औरंगाबादेत जखमी अवस्थेतील दुसऱ्याही बिबट्याने  घेतला अखेरचा श्वास ; वन्यप्रेमींमध्ये हळहळ
| Updated on: Feb 26, 2022 | 12:40 PM

औरंगाबादः सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे सलग दुसऱ्या दिवशी आढळून आलेल्या जखमी बिबट्यावर (Injured Leopard) वनविभागाने उपचार केले. मात्र उपचारांना बिबट्याच्या शरीराने योग्य साथ न दिल्याने त्याचा अखेर मृत्यू झाला. जरंडी वन बिटातील काटीखोरा शिवारात अमरसिंग राजपूत यांच्या शेतात गुरुवारी (24 फेब्रुवारी) बिबट्या अत्यावस्थ स्थितीत (Aurangabad Leopard) आढळला होता. घटनास्थळावरील परिस्थितीवरून लगेचच रेस्क्यू टीम व वनाधिकाऱ्यांनी बिबट्यास उपचाराकरिता वेताळवाडी रोपवाटिका येथे हलविले होते. त्याठिकाणी तीन तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व सोयीसुविधाची व्यवस्था करून अत्याधुनिक पद्धतीने (Modern Treatment) उपचार सुरू झाले. गेल्या 24 तासापासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत असताना अखेर शुक्रवारी (25 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजेदरम्यान वन्यप्राणी बिबट्याने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

‘बिबट्याच्या मारेकऱ्यांची माहिती द्या, बक्षीस मिळवा’

स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यावस्थेत असलेल्या बिबट्याचे तीन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले असून मृत्यूच्या नेमक्या कारणाच्या अभिप्रायासाठी सदरील वन्यप्राण्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळा, औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी वनविभागाने तपास सुरू केला असून यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात कोणालाही कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास वनविभागास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवून त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन राहुल सपकाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव यांनी केले आहे.

वनविभागाने केली प्रयत्नांची पराकाष्ठा

वनविभागातील कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे प्राण वाचवण्यासाठी तीन डॉक्टरांचे पथक व रेस्क्यू टीम यांना पाचारण करून उपचाराची साधने, औषधे, oxygen सिलेंडर व इतर सर्व आवश्यक सुविधांची उपलब्ध करून औरंगाबाद व गुजरात येथील डॉक्टरांशी संपर्क साधून वन्यप्राणी बिबट्याचे प्राण वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले होते.
बिबट्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉ. व्ही. व्ही. चव्हाण पशुधन विकास अधिकारी सोयगाव, डॉ. शाम चव्हाण पशुधन विकास अधिकारी सिल्लोड,डॉ. रोहित धुमाळ विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा औरंगाबाद, वाय. व्ही. पाटील पशुधन पर्वेक्षक, ए. के. दाभाडे पशुधन पर्वेक्षक यांनी।कसोशीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र बुधवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.

इतर बातम्या-

VIDEO: सरकारने शब्द पाळला नाही, उपोषणाशिवाय पर्यायच नव्हता; खासदार संभाजी छत्रपतींचं उपोषण सुरू

Video – युक्रेनमधून 270 च्यावर भारतीय विद्यार्थ्यांना हलविले रोमानियात, दूतावासाच्या मदतीने लवकरचं येणार नवी दिल्लीत