Video – युक्रेनमधून 270 च्यावर भारतीय विद्यार्थ्यांना हलविले रोमानियात, दूतावासाच्या मदतीने लवकरचं येणार नवी दिल्लीत

युक्रेन व रोमानिया विमानतळावरील काही दृश्य पाठवली आहेत. जवळपास 250 च्या वर भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान दिल्लीला येणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व व्यवस्था भारतीय दूतावासाने व भारत सरकारने केलेली आहे.

Video - युक्रेनमधून 270 च्यावर भारतीय विद्यार्थ्यांना हलविले रोमानियात, दूतावासाच्या मदतीने लवकरचं येणार नवी दिल्लीत
युक्रेनमधून रोमानियात आलेले भारतीय विद्यार्थी.
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 12:27 PM

अमरावती : रशियाने युक्रेनसोबत लढाई सुरू केल्यानंतर तिथे MBBS च्या शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडचणीत आलेले आहे. यात अमरावती जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावास (Embassy of India) व भारत सरकारने तातडीने पावले उचलली. युक्रेनच्या चर्नोव्हस्की व आसपासच्या भागातील 270 च्यावर विद्यार्थ्यांना युक्रेनला लागूनच असलेल्या रोमानिया या देशात नेले आहे. रोमानियाच्या बोर्डरवर (On the border of Romania) रोमानीयन जनतेने भारतीय विद्यार्थ्यांना जेवणाची सुद्धा सोय केली आहे. अमरावती येथील साहीर तेलंग या विद्यार्थ्याने तेथील दृश्ये पाठवली आहेत. भारत सरकारने तातडीने पावले उचलली. सर्व विद्यार्थ्यांना युक्रेनवरून आणण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली. भारत सरकार व युक्रेनमधील भारतीय दूतावासाचे आभार मानले आहेत. उद्या किंवा परवा या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार आहे, अशी माहिती अमरावतीचा विद्यार्थी साहीर (Amravati student Sahir Telang) तेलंग या विद्यार्थ्याने दिली.

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला जातात विद्यार्थी

रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले केले. युक्रेनमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. रशियाने युक्रेनचे अनेक एअरपोर्टसुद्धा आपले लक्ष्य केले आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. या परिस्थितीमुळे भारतीय पालकांना मोठी चिंता वाटायला लागली होती. देशातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कालपर्यंत पालकांना धाकधूक वाटत होती. परंतु, आता अडीचशे विद्यार्थी युक्रेन देशाच्या बाहेर पडले आहेत. त्यामुळं ते लवकरच परत येतील, अशा आशावाद पालकांनी व्यक्त केलाय.

पाहा व्हिडीओ

विद्यार्थ्याने व्हिडीओ पाठवून दिली माहिती

मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने चर्नोवस्की व त्या आसपासच्या भागातील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना बसच्या साह्याने रोमानिया विमानतळावर नेण्यात आले. ही माहिती मूळ अमरावती येथील साहीर प्रसेनजित तेलंग या विद्यार्थ्याने दिली. युक्रेन व रोमानिया विमानतळावरील काही दृश्य पाठवली आहेत. जवळपास 250 च्या वर भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान दिल्लीला येणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व व्यवस्था भारतीय दूतावासाने व भारत सरकारने केलेली आहे. यामुळे पालकांनी भारत सरकारचे आभार मानले. अमरावती येथील 8 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

संबंधित बातम्या

Russia Ukraine War Live : रशियात फेसबूकवर बंदी

Nagpur | युक्रेनमध्ये अडकलेल्या किती जणांशी सरकारचा संपर्क? विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था काय

विदर्भातील 41 पेक्षा जास्त विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, पालक चिंतेत! प्रशासनाने जारी केले हेल्पलाईन नंबर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.