एकाचा मृत्यू, दुसऱ्याची मरणाशी झुंज, औरंगाबादमधील सोयगावात अस्वस्थता, वनविभागाची गुुप्तता कशासाठी?

औरंगाबादः सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील काटेकोरी शिवारात बुधवारी  कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवर चार ते पाच वर्षीय नर बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दिनांक 24) सकाळी काटेकोरी शिवारातील एका शेतात अत्यावस्थेत मादी बिबट्या (Leopard Injured) पडून असल्याची घटना उघडकीस आली आहे. लागोपाठ घडत असलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी शेतात मादी बिबट्या […]

एकाचा मृत्यू, दुसऱ्याची मरणाशी झुंज, औरंगाबादमधील सोयगावात अस्वस्थता, वनविभागाची गुुप्तता कशासाठी?
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 11:01 AM

औरंगाबादः सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील काटेकोरी शिवारात बुधवारी  कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवर चार ते पाच वर्षीय नर बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दिनांक 24) सकाळी काटेकोरी शिवारातील एका शेतात अत्यावस्थेत मादी बिबट्या (Leopard Injured) पडून असल्याची घटना उघडकीस आली आहे. लागोपाठ घडत असलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी शेतात मादी बिबट्या जिवंत अत्यावस्थेत पडून होता घटनास्थळी वनविभागाचे (Forest Department) दोन कर्मचारी हजर झाले होते. मात्र अत्यावस्थेत असलेल्या बिबट्यास वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब होत असल्याने तो देखील तडफडत होता. तब्बल तीन तासानंतर बिबट्यास (Aurangabad Leopard) सुरक्षित ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले. बिबट्याच्या प्रकृतीबाबत विचारणा करण्यासाठी पत्रकारांनी संपर्क साधला असता वन विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. सध्या तरी मादा बिबट्या जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

एकाचा मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज

स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील काटेकोरी शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवर बुधवारी सकाळी अत्यावस्थेत बिबट्या पडून असल्याचे मजुरांना दिसताच या बाबत मजुरांनी वनविभागाला माहिती दिली होती. मात्र वनविभागाचे पथक उशिरा घटनास्थळी पोहचले होते.दरम्यान अत्यावस्थेत असलेला बिबट्या तडफडत असतांना त्या बिबट्यास वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अखेर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चार ते पाच वर्षीय नर बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला होता. त्यांनतर औरंगाबाद येथील शीघ्र कृती दल घटनास्थळी उशिरा चार वाजता पोहचल्याने शीघ्र कृती दल पथकातील वैद्यकीय तज्ञांनी बिबट्यास मृत घोषित केले होते. ही घटना ताजी असतांना गुरुवारी सकाळी त्याच परिसरात शंभर मीटर अंतरावर दुसरी घटना घडली.  एका शेतात मादी बिबट्या पडून असल्याचे शेळ्यांपाळ नाऱ्यांना दिसल्याने त्यांनी धूम ठोकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली वनविभागाला ही माहिती देण्यात आली. यावेळी सकाळी शेतात मादी बिबट्या जिवंत अत्यावस्थेत पडून होता घटनास्थळी वनविभागाचे दोन कर्मचारी हजर झाले होते. मात्र अत्यावस्थेत असलेल्या बिबट्यास वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब होत असल्याने तो देखील तडफडत होता. तब्बल तीन तासानंतर बिबट्यास सुरक्षित ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे.

Aurangabad leopard

गुरुवारी जखमी अवस्थेत आढळलेला बिबट्या

वनविभागाची माहिती देण्यास टाळाटाळ

उपचार करणारे पथक किती वाजता आले?, उपचारास केंव्हा सुरुवात करण्यात आली ?, त्यानंतर बिबट्याचे काय झाले?बिबट्याचे वय किती? तसेच बुधवारी मृत झालेल्या बिबट्याचे शवविच्छेदन केंव्हा करण्यात आले या संदर्भात वनविभागाकडून काही माहिती देण्यात येत नसल्याने सावळा गोधळ निर्माण झाला आहे. दोन्ही बिबटे अत्यावस्थेत आढळून आल्याने भूकबळी की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. बुधवारी आढळलेल्या बिबट्याच्या मृत्यूस वनविभाग कारणीभूत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे. सकाळी अत्यावस्थेत पडून असलेल्या बिबट्याची वैद्यकीय काळजी वेळीच घेतली असती तर बिबट्याचा जीव वाचला असता अशी चर्चा त्याठिकाणी उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक,अधिकारी व वनविभागाचे कर्मचारी वनमजुर घटनास्थळी होते. औरंगाबाद येथील शीघ्र कृती दलाची उपस्थिती होती. नियोजनाचा अभाव असल्याने वनविभागाकडून बुधवारी काटेकोरी शिवाराचा परिसर पिंजून काढला नसल्याने गुरुवारी सकाळी शेतात मृत्यूच्या दाढेत असलेल्या मादी बिबट्यावर ही वेळ आली नसती असे गावकरी सांगतात. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नर बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला. तर मादी बिबट्या संदर्भात वनविभाग माहिती देत नसल्याने सोयगाव वनविभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

Aurangabad leopard

वर्षभरातील वर्षभरात चौथा बिबट्या अत्यवस्थ

तालुक्यातील घोसला गावाजवळील जोगेश्वरीच्या जंगलालगत असलेल्या एका शेतात दोन ते अडीच वर्षीय व काही अंतरावर अडीच ते तीन वर्षीय नर जातीच्या दोन बिबट्याचा सांगाडा कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र या दोन बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की घातापाताने झाला हे मृत्यूच्या दहा महिन्यानंतर सुद्धा शवविच्छेदनाचा अहवाल न आल्याने गुलदस्त्यात आहे. जरंडी प्रकरणात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी घोसला प्रकरणाचा मात्र उलगडा न झाल्याने वन्यजीव बाबत सोयगाव वनविभाग किती संवेदनशील आहे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पाठोपाठ बुधवारी व गुरुवारी वनविभागाच्या चारचाकी गाड्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून गेल्याने अतिवृष्टीत मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याच्या कपाशीच्या झाडांसह लिंबोणीच्या कलमा, ठिबकच्या नळ्या व पाईप लाईन फुटल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक वाढवून त्याची निगा राखण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्याचे झालेले नुकसान कोण भरून काढणार हे निरुत्तरीत आहे.

इतर बातम्या-

औरंगाबाद | सोयगावात बिबट्याचा तडफडून मृत्यू, वेळेवर उपचाराअभावी जनावर दगावलं, स्थानिकांचा आरोप

IND vs SL: रवींद्र जाडेजावर LIVE मॅचमध्ये चढला ‘पुष्पा’चा फिवर, पहा मैदानावरच काय घडलं VIDEO

तुम्हाला तणावमुक्त करायला आलाय ‘लकडाऊन’, व्हा… बी पॉझिटिव्ह!

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.