AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: रवींद्र जाडेजावर LIVE मॅचमध्ये चढला ‘पुष्पा’चा फिवर, पहा मैदानावरच काय घडलं VIDEO

दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱा रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) काल सामन्यादरम्यान वेगळ्या अंदाजात दिसला. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनची त्याची स्टाइल बदलली आहे.

IND vs SL: रवींद्र जाडेजावर LIVE मॅचमध्ये चढला 'पुष्पा'चा फिवर, पहा मैदानावरच काय घडलं VIDEO
| Updated on: Feb 25, 2022 | 10:52 AM
Share

लखनौ: दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱा रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) काल सामन्यादरम्यान वेगळ्या अंदाजात दिसला. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनची त्याची स्टाइल बदलली आहे. टीम इंडियाचा (Team India)सरजी थोडा फिल्मी झाला आहे. रवींद्र जाडेजावर सध्या देशभरात हीट ठरलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिवर आहे. मैदानावर जाडेजा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाचा हिरो अल्लू अर्जुनची स्टाइल मारताना दिसला. लखनौमध्ये काल भारत-श्रीलंकेदरम्यान टी-20 मालिकेतील पहिला सामना झाला. मैदानावर श्रीलंकन फलंदाजाची विकेट काढल्यानंतर जाडेजाने अल्लू अर्जुनचा अंदाज दाखवला. जाडेजाची सेलिब्रेशनची ही स्टाइल लगेच कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. काल पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. या सामन्यात जाडेजाना चांगली कामगिरी केली. त्याने चार षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली.

LIVE मॅचमध्ये जाडेजा झाला फिल्मी

या सामन्यात रवींद्र जाडेजाला दिनेश चंडीमलच्या रुपाने एकमेव विकेट मिळाला. हा एक विकेट काढल्यानंतर जाडेजाने जे केलं ती ACTION लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘पुष्पा’ चित्रपटाचा हिरो अल्लू अर्जुनची ही स्टाइल होती. फक्त रवींद्र जाडेजाच नव्हे अनेक जण अल्लू अर्जुनच्या या स्टाइलच्या प्रेमात पडले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.

हे सर्व श्रीलंकेचा डाव सुरु असताना 10 व्या षटकात घडलं. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जाडेजाने चंडीमलचा विकेट घेतला. त्यानंतर जड्डू फिल्मी अंदाजात दिसला.

यापूर्वीही पुष्पा चित्रपटाची स्टाइल मारली जाडेजावर पुष्पा चित्रपटाचा फिवर चढल्याची ही काही पहिली वेळ नाहीय. दुखापतीमूळे संघाबाहेर असताना त्याने असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. भारत-श्रीलंकेमध्ये दुसरा टी-20 सामना 26 फेब्रुवारीला धर्मशाळामध्ये होणार आहे. त्यानंतर तिसरा सामनाही तिथेच होईल. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेने सुरु झालेली भारताची विजयी मालिका श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्येही कायम आहे. आज लखनऊनमध्ये झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी सहज विजय मिळवला. भारताने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने निर्धारीत 20 षटकात सहाबाद 137 धावा केल्या.

india vs srilanka ravindra jadeja doing allu arjuns style celebration from pushpa movie when he takes wicket

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.