Aurangabad | औरंगाबादेतील सफारी पार्क परिसरात अतिक्रमण व अवैध रेती धुण्यावर कारवाई, जेसीबी आणि टिप्पर जप्त

| Updated on: Jun 02, 2022 | 1:19 PM

मनपा अधिकारी पाहणी करत असताना अवैध रेती धुण्याचे प्रकार उघडकीस आले आणि याबाबत तत्काळ कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलिस विभागामार्फत या कार्यवाही अंतर्गत वापरण्यात आलेल्या जे सी बी (एक्सकैवेटर) व टिपर हे जप्त करण्यात आले

Aurangabad | औरंगाबादेतील सफारी पार्क परिसरात अतिक्रमण व अवैध रेती धुण्यावर कारवाई, जेसीबी आणि टिप्पर जप्त
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद: शहरातील सिद्धार्थ उद्यान (Siddharth Garden) ज्या ठिकाणी हलवलं जाणार आहे, त्या मिटमिटा येथील सफारी पार्क (Safari Park) परिसराला मनपा प्रशासक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. या प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमण, रेती उपसा आणि वीज चोरीवर प्रशासकांच्या वतीनं तत्काळ कारवाई करण्यात आली. तसेच सफारी पार्कपर्यंत रस्त्यासाठी भूसंपादन करण्याकरिता मनपा (Aurangabad municipal corporation) नगररचना विभाग आणि स्मार्ट सिटीने संयुक्त प्रस्ताव सादर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.  औरंगाबाद स्मार्ट सिटीने हाती घेतलेल्या महत्वकांक्षी सफारी पार्क प्रकल्पाचे काम एप्रिल 2021 मध्ये सुरू झाले असून आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. 200 कोटी रुपये एवढा निधी लावून जागतिक दर्जाचे प्राणी संग्रहालय व सफारी पार्क बनवण्यात येत आहे. येथे दरवर्षी दहा लाख पर्यटकांची अपेक्षा आहे. ह्या प्रकल्पामुळे शहराच्या पर्यटन मूल्यामध्ये वाढ व अर्थव्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहे.

प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न

हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा. उच्च दर्जाचा प्रकल्प विकसित करण्यात यावा यासाठी मनपा, स्मार्ट सिटी व राज्य शासन प्रयासरत आहे. ह्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी अन्य अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाच्या साईटची पाहणी केली. यावेळेस स्मार्ट सिटी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, शहर अभियंता सखाराम पानझडे, मनपा उपायुक्त व स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे, स्मार्ट सिटी चे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, नगर रचना उपसंचालक ए बी देशमुख, महावितरण चे अधिक्षण अभियंता, मनपा नगर रचना उप अभियंता संजय कोंबडे जिल्हा खनिकर्म अधिकारी, छावणी पोलीस चे पी एस आय व अन्य उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

अवैध रेती धुण्याचे प्रकार

मनपा अधिकारी पाहणी करत असताना अवैध रेती धुण्याचे प्रकार उघडकीस आले आणि याबाबत तत्काळ कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलिस विभागामार्फत या कार्यवाही अंतर्गत वापरण्यात आलेल्या जे सी बी (एक्सकैवेटर) व टिपर हे जप्त करण्यात आले व महावितरण तर्फे यासाठी करण्यात आलेली वीज चोरी बद्दल कार्यवाही केली. सोबतच प्रकल्पाच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी मनपा अतिक्रमण विरोधी विभागचे प्रमुख व अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांना प्रशासकांनी निर्देश दिले. मुख्य रोडवरून सफारी पार्कला जाण्यासाठी रस्ते बांधण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादन करण्यासाठी प्रशासक यांनी स्मार्ट सिटी व मनपाच्या नगर रचना विभागाला संयुक्त प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी प्रशासकांमार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविण्याचे निर्देश दिले. ह्यावेळेस प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाची पाहणी करून काम दर्जेदार व लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.