Good News | औरंगाबाद बनणार ऑक्सिजन निर्मितीचे हब, ऑरिक सिटीत एअरॉक्सचा उत्पादन प्रकल्प!

औरंगाबादः ऑक्सिजन जनरेटर प्लांट क्षेत्रातील अग्रेसर कंपनी अशी ओळख असलेल्या एअरॉक्स टेक्नोलॉजीच्या (Airox technologies) उत्पादन प्रकल्पांची सुरुवात औरंगाबादमधील ऑरिक सिटीत होत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये आता वाहने आणि ब्रेव्हरेज यानंतर ऑक्सिजन निर्मितीचे (Oxygen generator) शहर अशी नवी ओळख मिळणार आहे. या नव्या उत्पादन प्रकल्पामुळे औरंगाबादसह देशभरात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होऊन देशाच्या विकासात हातभार लावला […]

Good News | औरंगाबाद बनणार ऑक्सिजन निर्मितीचे हब, ऑरिक सिटीत एअरॉक्सचा उत्पादन प्रकल्प!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः ऑक्सिजन जनरेटर प्लांट क्षेत्रातील अग्रेसर कंपनी अशी ओळख असलेल्या एअरॉक्स टेक्नोलॉजीच्या (Airox technologies) उत्पादन प्रकल्पांची सुरुवात औरंगाबादमधील ऑरिक सिटीत होत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये आता वाहने आणि ब्रेव्हरेज यानंतर ऑक्सिजन निर्मितीचे (Oxygen generator) शहर अशी नवी ओळख मिळणार आहे. या नव्या उत्पादन प्रकल्पामुळे औरंगाबादसह देशभरात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होऊन देशाच्या विकासात हातभार लावला जाईल, असे मत एअरॉक्स टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय जैस्वाल यांनी व्यक्त केले. ऑरिक सिटीत (Auric city) नुकतेच एअरॉक्सच्या नव्याने सुरु होत असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

ऑक्सिजन जनरेटरमधील अग्रेसर ब्रँड

एअरॉक्सने आतापर्यंत अनेक नामांकित शासकीय आणि खासगी रुग्णालय तसेच संस्थांमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प उभारले आहेत. ऑक्सिजन जनरेटर क्षेत्रात हा अग्रगण्य ब्रँड आहे. आजपर्यंत पीएम केअर फंड अंतर्गत सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटीत 60, युनायटेड नेशनच्या चिल्ड्रन्स फंड अंतरग्त युनिसेफसाठी 34 ऑक्सिजन जनरेटर प्लांट कंपनीच्या वतीने उभारण्यात आले आहेत. तसेच टोयोटा, बजाज ग्रामसेवा संस्था, वॉलमार्ट, रिलायन्स, टाटा, अजिम प्रेमजी फाउंडेशन, डॉक्टर्स फॉर यू, कम्युनिटी पार्टनर्स इंटरनॅशनल, युनायटेड वे ऑफ बंगलुरू आदी अनेक संस्थांमध्ये कंपनीने ऑक्सिजन जनरेटर प्लांट उबारले आहेत. तसेच औरंगाबादमधील नामांकित 20 रुग्णालयातदेखील कंपनीने प्लांट उभारले आहेत. सध्या देशातील एकूण ऑक्सिजन निर्मितीत एकट्या एअरॉक्सचा वाटा 8 टक्के एवढा आहे.

औरंगाबादचा प्रकल्प कसा?

– ऑरिक सिटीत कंपनी दोन टप्प्यात स्वतःचा उत्पादन प्रकल्प उभारत आहे. – पहिल्या टप्प्यात 42 हजार चौरस फूट जागेत कच्च्या उत्पादनाचा दर्जा तपासणारे तंत्रज्ञान, पाच टन क्षमता असलेली क्रेन, दर्जेदार उत्पादनासाठी तापमान व वातावरण नियंत्रित करणारी यंत्रणा आदींनी प्रकल्प सज्ज असेल. – सर्वोत्तम टीआयजी/एमआयजी वेल्डिंग मशीन, 200 हॉर्सपॉवर्सचे एअर कॉम्प्रेसर, मोटार व स्क्रू टेस्टिंग/ रिप्लेसिंग मशीनरी आणि ऑनलाइन ऑक्सिजन तपासणी यंत्रणा येथे असेल. – या ठिकाणी प्रामुख्याने पीएसए ऑक्सिजन जनरेटर, रेफ्रिजरेटर कॉम्प्रेशर एअर ड्रायर, ऑक्सिजन अॅनलायजर व ऑटो चेंज ओव्हर सिस्टिम आदी उत्पादनांचा समावेश असेल. – या माध्यमातून पहिल्या वर्षात 5 व्हेंडर्स तर 35 जणांना रोजगार मिळणार आङहे. तर दुसऱ्या फेजमध्ये 65 ते 70 हजार चौरस फूट जागेवर प्रकल्प विस्तारण्यात येणार असून याद्वारे जवळपास 150 च्या आसपास नागरिकांना रोजगार मिळेल, असे सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या-

काश्मीर फाईल्सवरुन राजकारण तापणार

100 हून अधिक वॉच फेसेस, 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, Truke Horizon Smartwatch बाजारात, किंमत…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.