‘डॉक्टर’ कराड त्या वेळी धावून आले नसते तर माझ्या मुलाचा जीव गेला असता, औरंगाबादच्या नागरिकाच्या भावूक आठवणी, आज तो मुलगा 21 वर्षांचा…

| Updated on: Sep 04, 2021 | 12:47 PM

सरांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत. माझ्या आयुष्यात, माझ्या करिअरमध्ये एवढे कुणीही उपकार माझ्यावर कुणी केले नाहीत. तो मुलगा आता 21 वर्षांचा आहे..' असं म्हणताना नाना पाटील भावूक झाले आणि डॉ. कराडांच्या पाया पडले.

डॉक्टर कराड त्या वेळी धावून आले नसते तर माझ्या मुलाचा जीव गेला असता, औरंगाबादच्या नागरिकाच्या भावूक आठवणी, आज तो मुलगा 21 वर्षांचा...
औरंगाबादमधील नागरिक नाना पाटील आणि डॉ. भागवत कराड चर्चा करताना.
Follow us on

औरंगाबाद: केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) हे औरंगादमधील हे राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्व असलं तरीही शहरातील जुन्या नागरिकांमध्ये ते एक उत्तम बालरोग सर्जन म्हणून परिचित आहेत. किंबहुना अत्यंत गरजेच्या वेळी धावून येणारा डॉक्टर, डॉक्टरकीच्या पेशातील माणूस अशी प्रतिमा त्यांची आहे. डॉ. भागवत कराड यांनी नुकतेच ट्विटरवर टाकलेल्या एका पोस्टवरून त्यांच्या डॉक्टरकीच्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला. त्या काळात त्यांनी एका लहान मुलावर शस्त्रक्रिया केली होती, त्याचे वडील या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

‘हे उपकार विसारणार नाही’

औरंगाबादचे नागरिक नाना पाटील हे या व्हिडिओमध्ये म्हणतात, माझ्या मुलाच्या आतड्याचं अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन केलं नसतं तर मुलगा जिवंत राहणार नाही, त्यावेळी डॉक्टर साहेब म्हणाले, देवावर विश्वास ठेवा. पाटील साहेबांच्याच हॉस्पिटलमध्ये सरांनी त्यांचा वेळ दिला. मुलाचे शरीरातील आतड्यांमध्ये गॅप होता. तो गॅप काढला, आतडी पुन्हा जोडली. त्यामुळे मुलाच्या शरीरातील शौचाची क्रिया सुरळीत झाली. त्यामुळे सरांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत. माझ्या आयुष्यात, माझ्या करिअरमध्ये एवढे कुणीही उपकार माझ्यावर कुणी केले नाहीत. तो मुलगा आता 21 वर्षांचा आहे..’ असं म्हणताना नाना पाटील भावूक झाले आणि ते डॉ. कराडांच्या पाया पडले.

 

असेच कार्य हातून घडत रहावे- डॉ. कराड

नाना पाटील यांच्या या भावूक संवादाला डॉ. भागवत कराड यांनीही उत्तर दिले. ट्विटरवरील प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले की, असेच कार्य सदैव माझ्या हातून घडत रहावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. माझ्या वैद्यकीय कारकीर्दीत मी निस्वार्थपणे कशाचीही अपेक्षा न ठेवता लोकांची सेवा केली. या दरम्यान काही वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक पेचप्रसंग पण माझ्यापुढे आले पण मी न डगमगता सेवाभाव जपत ईश्वरकृपेने माझे कार्य करत राहिलो.

शहरातील अनेक नागरिकांच्याही प्रतिक्रिया

डॉ. कराडांच्या डॉक्टरकीच्या काळातील आठवणी जाग्या करणाऱ्या या व्हिडिओमुळे इतरही नागरिकांनी जुन्या दिवसांचे किस्से ट्विटरवर शेअर केले. त्यात प्रमोद मुंडे यांनीही ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘ मला आजही आठवत ,आम्ही समर्थनगर मध्ये राहत असू,माझी आई ज्या वेळी अस्वस्थ असायची. त्यावेळी तुम्ही धावून आले, आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत ,आज माझी आई हयात नाही ,ती खूप आनंदित झाली असती.’ तसेच डॉक्टरांच्या हातून असेच समाजकार्य घडत राहो, अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

डॉ. कराड मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन

डॉ. कराड हे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील असून त्यांनी औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षण घेत ते मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन बनले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी 1996 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आलेले कराड हे शहराचे दोन वेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आणि दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाड्यात भाजप वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. शेतकरी पुत्र असलेल्या डॉ. कराड यांचा नगरसेवक ते केंद्रातील मंत्री असा राजकीय प्रवास झाला. त्यांना मंत्रिपद देऊन भाजपने एकप्रकारे राज्यातील ओबीसींना मोदी सरकारमध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे.

इतर बातम्या- 

मंत्री भागवत कराड सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला, मुलाने विचारलं, मास्क काढू का? मोदी म्हणाले, आपल्यासोबत दोन दोन डॉक्टर! 

नाराजी दूर करण्यासाठीच भागवत कराडांची गोपीनाथ गडावरून यात्रा ? चर्चेवर पंकजा मुंडेंचे उत्तर, म्हणाल्या…