AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाराजी दूर करण्यासाठीच भागवत कराडांची गोपीनाथ गडावरून यात्रा ? चर्चेवर पंकजा मुंडेंचे उत्तर, म्हणाल्या…

कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र यावर आता पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.जोल

नाराजी दूर करण्यासाठीच भागवत कराडांची गोपीनाथ गडावरून यात्रा ? चर्चेवर पंकजा मुंडेंचे उत्तर, म्हणाल्या...
PANKAJA MUNDE
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 11:38 PM
Share

बीड / पऱळी : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) उद्यापासून (16 ऑगस्ट) सुरु होत आहे. ही यात्रा बीडमधील परळी येथील गोपीनाथ गडावरुन (Gopinath Gad) निघणार आहे. कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र यावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे. कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम आहे. ही मुंडे यांच्याविषयीची भावना आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. (Bhagwat Karad starting his Jan Ashirwad yatra from Gopinath Gad Pankaja Munde said politicians have special bonding with Gopinath Munde)

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात मुंडे भगिनींना स्थान न दिल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. याच चर्चेनंतर मुंडे भगिनींच्या समर्थकांनी राजीनामासत्र सुरु केले होते. राजीनामासत्रांचा एक अंक संपल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या यात्रेला गोपीनाथ गडावरून सुरुवात होणार आहे. पंकजा यांची नाराजी दूर करण्यासाठीच यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरुन सुरु होत असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना “कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम व त्यांच्या विषयीची भावना आहे. त्यामुळेच कराड ही यात्रा गोपीनाथ गडावरुन काढत आहेत. गोपीनाथ मुंडे आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे,” असं पंकजा यांनी म्हटलंय.

16 ते 21 ऑगस्टदरम्यान कराडांची यात्रा

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. “भव्य जनआशिर्वाद यात्रा… दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021 , मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलंय. भागवत कराड आज केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचं लोक म्हणतात.

इतर बातम्या :

‘तुम्ही नारळ फोडत राहा, उमेदवारी मला मिळो’, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी

शहिदांच्या कुटुंबीयांचे पाय धुतले, नंतर चांदीच्या ताटात प्रेमाने घास भरवला, बच्चू कडू यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ?” औरंगाबादच्या नामांतरावरुन इम्तियाज जलील आक्रमक, वाद पुन्हा पेटणार ?

(Bhagwat Karad starting his Jan Ashirwad yatra from Gopinath Gad Pankaja Munde said politicians have special bonding with Gopinath Munde)

Follow Us
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...