Aurangabad | तोंडावरचा मास्क काढला अन् CCTV नं टिपला, कुख्यात गुन्हेगार राजेंद्र भीमा चव्हाण प्रेयसीच्या घरातून पकडला

| Updated on: Mar 18, 2022 | 12:54 PM

पाच दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलीसांचे पथक पाच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोहोचले. पप्पू सतत गावठी कट्टा बाळगतो, अशी माहिती पोलिसांना होती. त्यामुळे त्याला सावधानतेनेच पकडणे आवश्यक होते.

Aurangabad | तोंडावरचा मास्क काढला अन् CCTV नं टिपला, कुख्यात गुन्हेगार राजेंद्र भीमा चव्हाण प्रेयसीच्या घरातून पकडला
अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई
Image Credit source: tv 9
Follow us on

औरंगाबादः खून, दरोडा, मंगळसूत्र चोरी अशा प्रकारचे तब्बल 14 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार  राजेंद्र भीमा चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. औरंगाबादच्या जवाहर नगर पोलीसांच्या (Aurangabad police) विशेष पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. प्रेयसीला भेटण्यासाठी तो अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे गेला होता. पोलिसांनी अत्यंत शिताफीनं सापळा रचत त्याला अटक केली. कारण पप्पू  हा नेहमीच गावठी कट्टा बाळगून असतो, त्याला पकडणे एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते, याची कल्पना पोलिसांना होती. त्यामुळेच अत्यंत सावधगिरी बाळगत सापळा रचून (police trap) पोलिसांनी त्याला बेलापूर येथून अटक केली.

सीसीटीव्हीच्या मदतीने सुगावा मिळाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र भीमा चव्हाण ऊर्फ पप्पू (28) असं या आरोपीचं नाव असून शहानूरमिया दर्गा परिसरात 1 फेब्रुवारी रोजी आणि आकाशवाणीजवळ 10 मार्च रोजी पप्पूने साथीदारांसोबत मंगळसूत्र हिसकावले होते. जवाहरनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक या प्रकरणी तपास करीत होते. आकाशवाणीपासून शहराबाहेर जाईपर्यंत पोलिसांनी जवळपास 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीमध्ये पप्पूच्या साथीदाराने मास्क काढला त्यावरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस पप्पूच्या फोन कॉलचाही अभ्यास करीत होते.

श्रीरामपूर येथून पकडला

दरम्यान, पाच दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलीसांचे पथक पाच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोहोचले. पप्पू सतत गावठी कट्टा बाळगतो, अशी माहिती पोलिसांना होती. त्यामुळे त्याला सावधानतेनेच पकडणे आवश्यक होते. पाचव्या दिवशी तो बेलापूर येथील प्रेयसीच्या घरात गेल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला पकडले. त्याला ताब्यात घेताला प्रेयसीनेही मोठा गोंधळ घातल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली.

इतर बातम्या-

नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय, लॉन्स फेडरेशनची स्थापना; Corona संकटातून बाहेर काढण्यासाठी चर्चा

गोंदियामध्ये टाकाऊ वस्तूंपासून तयार केली पक्षांसाठी पाणपोई