Aurangabad | खाम नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी, 50 कोटींचा डीपीआर सादर

खाम नदीपात्राची अवस्था नाल्यासारखी झाली होती. शेकडो नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी पात्रात सोडले होते. काही ठिकाणी पात्राची स्वच्छा करण्यात आली आहे. आता उर्वरीत विकास कामांसाठी शासनाकडे निधी मागण्यात आला आहे.

Aurangabad | खाम नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी, 50 कोटींचा डीपीआर सादर
| Updated on: Mar 01, 2022 | 4:01 PM

औरंगाबादः शहरातील प्राचीन खाम नदीला (Kham River) गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी औरंगाबाद महापालिका (Aurangabad municipal Corporation) प्रशासकांचे जवळपास वर्षभरापासून प्रयत्न सुरु आहेत. लोकसहभागातून प्रशासकांनी ही मोहीम सुरु केली होती. आतापर्यंत यासाठी एक रुपयादेखील खर्च करण्यात आला नव्हता. मात्र नदीपात्र स्वच्छता आणि सुशोभिकरणातील पुढील टप्प्याकरिता महापालिकेने 50 कोटी रुपयांचा डीपीआर सोमवारी राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. ही माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी दिली.

माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत पुनरुज्जीवन

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. यासाठी महापालिका, स्मार्च सिटी, छावणी परिषद, इकोसत्व व्हेरॉक यासह सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोखंडी पूल परिसरात तब्बल सात किलोमीटरपर्यंत विविध विकासकामे करण्यात आली. खाम नदीपात्राची अवस्था नाल्यासारखी झाली होती. शेकडो नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी पात्रात सोडले होते. काही ठिकाणी पात्राची स्वच्छा करण्यात आली आहे. आता उर्वरीत विकास कामांसाठी शासनाकडे निधी मागण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात 15 कोटींची विकासकामे

खाम नदीच्या विकासासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने तीन बंधाऱ्यांची दुरुस्ती, दोन नवीन बंधाऱ्यांचे बांधकाम, बेगमपुरा स्मशानभूमीपर्यंत संरक्षण भिंत बांधणे, डिजिटल डिव्हायसेस, नदीपात्रातील पाण्याची तपासणी, पाथ-वे फिरण्यासाठी रस्ता, बसण्यासाठी बेंचेस, जागोजागी डस्टबीन, तारेचे कुंपण, आदी कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 15 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 19 कोटी आणि तिसऱ्या टप्प्यात 16 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले.

इतर बातम्या-

Ambarnath | 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीचा रुद्राभिषेक

Grain Sieve : धान्य चाळणी एक कामे अनेक, शेतीमालाची प्रतवारी अन् योग्य दरही

तुमची खुर्ची हलतेय, किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल