तुमची खुर्ची हलतेय, किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, मी उद्योजकांसाठी काही करत नाही. आयटी पार्क नाशिकला येणे महत्त्वाचे आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघायला मला आवडते. युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मी गेलो. खूप मुलं भयभीत होते. मी त्यांना विश्वास दिला. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. मंत्रायलयात येत नाहीत, एअरपोर्टवर काय येणार, असा सवाल त्यांनी केला.

तुमची खुर्ची हलतेय, किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 3:43 PM

नाशिकः तुमची मंत्रालयातली खुर्ची हलते आहे. किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर आहेत. काही रोजी-रोटीसाठी बोलतात. पक्ष चालवण्यासाठी काहींनी आमच्याशी चर्चा केली. एकत्र लढले आणि नंतर स्वार्थासाठी पळ काढला. जे पळून बाहेर पडले, ते आता पंतप्रधान मोदींवर बोलत आहेत. तुम्ही हिमालयाची उंची असलेल्या पंतप्रधानांवर टीका करत आहात. त्यासाठी तुमची लायकी असली पाहिजे, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मंगळवारी नाशिकमध्ये (Nashik) केला. राणेंच्या हस्ते आयटी परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. राणे म्हणाले की, राजकारण आणि उद्योग (Industry) वेगळे ठेवले तर रिझल्ट मिळतो. माझ्या पक्षाचे लोक आल्यानंतर त्यांचे काम करायचे हे माझे काम. माझ्या नेत्यांना काय लागते, त्यांना काय पाहिजे याचा विचार करणारा मी आहे. मी येणार म्हणून कमिशनर पळून गेले. खरे तर त्यांनी उपस्थित रहायला पाहिजे होते. काही जणांनी कमिशनरला वेगळेच सांगितल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेने जमिनी लाटल्या…

राणे म्हणाले की, कोकणात यांना एन्रॉन नको आहे. मात्र, मात्र सगळे कॉन्ट्रॅक्टचे काम शिवसेनेच्या लोकांनी घेतले. नाणारला विरोध केला. सगळ्या जमिनी शिवसैनिकांनी घेतल्या. याला शिवसेना म्हणतात. विमानतळासाठी आंदोलन केले. योगायोगाने सत्ता तीन पक्षाची आली. खरे तर विरोध आयटी पार्कला नाही. राणेला आहे. जिथे – जिथे राणे जातात तिथे शिवसेना विरोध करते.

एकाही कामासाठी आले नाहीत…

राणे म्हणाले की, देशातील सगळ्यात विकसित असलेले राज्य आज मागे पडले आहे. एकाही कामासाठी माझ्याकडे आले नाहीत. इथले कमिशनर माझ्याकडे कामाला होते. त्यांना सांगितले असेल, गेलात तर तुमची बदली करतो. माझ्याजवळ ना नाही. प्रत्येकाला हो म्हणायचे माझे काम आहे. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवायचे. महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करण्याची भूमिका हवी. अमेरिका, जपान, जर्मनी उद्योगात कितीतरी पुढे गेली आहे. भारत महासत्ता बनावी ही मोदींची इच्छा आहे. मुकेश अंबानी, महेंद्र माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना मानतो, कारण ते अनेकांना रोजगार देतात. ते किती कमवतात हे बघू नका. किती जणांना रोजगार देतात हे महत्वाचे.

स्वार्थासाठी पळ काढला…

राणे म्हणाले की, जगातील अनेक देश बघितले आहेत. मात्र, असे आपल्याकडे कधी होईल असे वाटते. लोक देतात निवडून तोपर्यंत मंत्री. ज्या- ज्या मार्गाने जनतेची सेवा करता येईल ते करू. 1991 पासून मला संरक्षण आहे. नितेशला 307 ची केस लावली. तुमची मंत्रालयातील खुर्ची हलते आहे. काही रोजी-रोटीसाठी बोलतात. पक्ष चालवण्यासाठी काहींनी आमच्याशी चर्चा केली. एकत्र लढले आणि नंतर स्वार्थासाठी पळ काढला. जे पळून बाहेर पडले, ते आता पंतप्रधानांवर बोलतात. हिमालयाची उंची असलेल्या पंतप्रधानांवर टीका करतात तुम्ही. लायकी असली पाहिजे, असा हल्लाबोल राणेंनी केला.

कोण आहे वेटिंगवर…

राणे म्हणाले की, मंत्रालयात जात नाहीत, कुठे जात नाहीत. तुम्ही टीका काय करता, टोमणे काय मारता. बेकारी कशी संपेल याबद्दल बोला ना. मराठी तरुण आज उध्वस्त होतोय. इथली मुले वसई विरारच्या पुढे गेले. तिथे मोठ्या इमारती झाल्या. तिथे यांची पार्टनरशीप आहे. यांचे वाचन तरी आहे का. पवारांची मेहेरबानी. जमवाजमव केली आणि केले सगळे. स्थायी समितीचा मुंबई अध्यक्ष आणि किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर आहेत.

उद्या आमच्यासोबत या…

राणे म्हणाले की, मी उद्योजकांसाठी काही करत नाही. आयटी पार्क नाशिकला येणे महत्त्वाचे आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघायला मला आवडते. युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मी गेलो. खूप मुलं भयभीत होते. मी त्यांना विश्वास दिला. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. मंत्रायलयात येत नाहीत, एअरपोर्टवर काय येणार. अख्खा महाराष्ट्रच आजारी पडला आहे. बाकीची पक्षातील मंडळी इथे आली. आज तिकडे आहेत, उद्या आमच्यासोबत आलात तरी चालेल, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मोठे पाऊल

tv9 Explainer: रशिया यूक्रेनमध्ये घुसला खरा पण गेल्या 5 दिवसात त्याला त्यात किती यश आलंय? समजून घेऊया 10 मुद्यांच्या माध्यमातून

Russia Ukrane War: तब्बल 64 KM चा रशियन ताफा, कीवला घेरण्यासाठी रशिया सज्ज

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.