Aurangzeb: अशा बादशहाच्या कबरीवर फुलं कशी व्हायची, ज्यानं स्वत:च्या भावाचं आधी शिर धडावेगळं केलं अन् नंतर धुवून पाहिलं

| Updated on: May 13, 2022 | 10:49 AM

खा. जलील यांच्या या कृतीमुळे भाजप, शिवसेनेकडून तसेच सामान्य नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याचं कारणंही तसंच आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर औरंगजेब बादशहा किती क्रूर आणि किळसवाणा होता, याचा प्रत्यय येतो. साम्राज्याची गादी हडपण्यासाठी सख्ख्या भावाचं शीर धडावेगळं करण्याच्या या पाशवी रक्तापुढं नतमस्तक होण्याची हिंमतच कशी होते, असा प्रश्न विचारला जात आहे.

Aurangzeb: अशा बादशहाच्या कबरीवर फुलं कशी व्हायची, ज्यानं स्वत:च्या भावाचं आधी शिर धडावेगळं केलं अन् नंतर धुवून पाहिलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आज औरंगाबादेत औरंगजेबाच्या (Auranzeb) कबरीचं दर्शन घेतलं. यावरून मोठा गदारोळ माजला आहे. हिंदुंची मंदिरं उध्वस्त करणाऱ्या, संत परंपरेत खंड पाडणाऱ्या औरंगजेबासमोर हे कसे नतमस्तक होऊ शकतात, असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही मुस्लिम बांधवांच्या घरात औरंगजेबाला पूजलं जात नाही, कोणतेही मुस्लिम औरंगजेबाचं नाव आपल्या मुलाला देत नाही, याचं कारणच हे आहे, असं खैरे म्हणाले. खुद्द एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही यापूर्वी आपण औरंगजेबाच्या कबरीसमोर कधीही गुडघे टेकले नाहीत, असं म्हटलं होतं. मात्र आज खासदार जलील यांनी थेट औरंगजेबाच्या कबरीवरच फुलं वाहिली. खा. जलील यांच्या या कृतीमुळे भाजप, शिवसेनेकडून तसेच सामान्य नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याचं कारणंही तसंच आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर औरंगजेब बादशहा किती क्रूर आणि किळसवाणा होता, याचा प्रत्यय येतो. साम्राज्याची गादी हडपण्यासाठी सख्ख्या भावाचं शीर धडावेगळं करण्याच्या या पाशवी रक्तापुढं नतमस्तक होण्याची हिंमतच कशी होते, असा प्रश्न विचारला जात आहे.

‘स्वतःच्या भावाचं शीर धडावेगळं केलं अन् ते धुवूनही पाहिलं’

औरंगजेब किती क्रूर होता, याचे अनेक किस्से इतिहासात सापडतील. मात्र स्वतःच्या भावाशी तो ज्या प्रकारे वागला तो अत्यंत क्रूर आणि किळसवाणा प्रकार आहे. 30 ऑगस्ट 1659 रोजी औरंगजेबानं स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाचा म्हणजेच दारा शुकोहचा क्रूरपणे खून केला आणि तो शहाजहानच्या साम्राज्याचा बादशाह झाला. शहाजहानची चार मुलं. दारा, शाहशुजा, औरंगजेब आणि मुराद बख्श. शहाजहान 67 व्या वर्षी आजारी पडला तेव्हा आता शहाजहानच्या साम्राज्याचा वारसा मोठा मुलगा दारा शुकोहकडे येणार हे निश्चित होतं. पण औरंगजेबला हे पटत नव्हतं. उर्वरीत दोन भावांचा प्रश्नच नव्हता. शहाजहान आजारी पडला तेव्हा दारानं इतर तिन्ही भावांना कळवलं नाही. अखेर तिन्ही भावंड दाराच्या विरोधात चाल करून आले. तगडं सैन्यदल असूनही दारा औरंगजेबसमोर हारला. युद्धातून तो फरार झाला. पण त्याच्या पाळतीवर असलेल्या औरंगजेबानं त्याला अखेर शोधून काढलं. दिल्लीत अत्यंत दैन्यावस्था करत दाराची धिंड काढण्यात आली. 30 ऑगस्ट 1659 रोजी दाराचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. असं सांगतात की, दाराचं कापलेलं शीर घेऊन सैनिक औरंगजेबकडे गेला. ते सगळं रक्तानं माखलेलं होतं. औरंगजेबानं दाराचं मुंडकं एका थाळीत ठेवायला लावलं. त्याला धुवून घ्यायला लावलं. तो दाराच आहे का, याची खआत्री केली. ते दाराचंच शीर असल्याची खात्री पटल्यावर तो धाय मोकलून रडला. औरंगजेब एवढ्यावरच थांबला नाही तर दाराच्या प्रेताची पुन्हा एकदा हत्तीवर धिंड काढून विटंबना करण्यात आली. शेवटी हुमायूनच्या कबरीशेजारी त्याला दफन करण्यात आलं. दाराची हत्या करणाऱ्यांनाही औरंगजेबानं आधी बक्षीसी दिला आणि नंतर त्यांचीही हत्या केली. (जादुनाथ सरकार यांच्या औरंगजेब या पुस्तकातील हे संदर्भ आहेत)..

‘तुझ्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवशील का?’

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर त्यात माझं काही चुकलंच नाही, अशी प्रतिक्रिया दिली. यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुस्लीम बांधवही तेथे जात नाहीत, मग खासदार जलील तिथे का गेले? तुम्ही तुमच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवाल का? असा सवाल खैरेंनी जलील यांना केला. तसंच औरंगजेबाच्या कबरीवर गुडघे टेकायला जाणारा खासदार चुकून जनतेनी निवडून दिला असून या कृतीद्वारे ते औरंगाबादचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप खैरे यांनी केला.