Aurangabad | स्मार्ट औरंगाबादेत डिजिटल स्क्रीनवर जाहिरातीची संधी, काय आहेत दर? कुठे करणार संपर्क?

जाहिराती देण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी 8055001551 ह्या नंबर वर कॉल करावा. या माध्यमातून शहरातील मुख्य चौकात बसवण्यात आलेल्या या डिस्प्लेच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल, असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Aurangabad | स्मार्ट औरंगाबादेत डिजिटल स्क्रीनवर जाहिरातीची संधी, काय आहेत दर? कुठे करणार संपर्क?
शहरातील या डिजिटल डिस्प्लेवर जाहिरात करण्याचे आवाहन स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 13, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः शहरात लावण्यात आलेल्या डिजिटल स्क्रीनवर (Digital Screen) जाहिरात करण्याची इच्छा असलेल्यांसाठी खुशखबर आहे. या स्क्रीनवर अगदी माफक दरात जाहिरात प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी स्मार्टी सिटीने उपलब्ध करून दिली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी (Aurangabad smart city) डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे शहरात एकूण 50 डिजिटल डिस्प्ले बसवण्यात आले आहेत. आता या स्क्रीनवर नागरिकांना सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या उत्पादनांची किंवा आपल्या व्यवसायाची जाहिरात (Digital Advertisement) करता येणार आहे. विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये, प्रमुख रस्त्यांवर हे डिस्प्ले लावण्यात आल्यामुळे व्यावसायिकांच्या उत्पादनांची किंवा त्यांच्या व्यवसायाची जाहिरात हजारो लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा हा मार्ग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात किती डिस्प्ले?

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीद्वारे संपूर्ण शहरभरात उत्तम दर्जाचे एकूण 50 डिजिटल डिस्प्ले बसवण्यात आले आहेत. यापैकी 45 डिस्प्ले हे 24 स्क्वेअर फूटचे तर 5 डिस्प्ले 63 स्क्वेअर फूटचे आहेत. स्मार्ट सिटीच्या मास्टर सिस्टम इंटेग्रेटर प्रकल्पा अंतर्गत हे स्क्रीन बसवण्यात आले आहेत. या डिस्प्लेवर स्मार्ट सिटी द्वारे जनजागृती आणि शहराची आणि स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची माहिती देण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या डिजिटल डिस्प्ले वर व्यावसायिक जाहिराती देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या अंतर्गत स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या देखरेखीखाली शहरातील 50 स्क्रीनवर जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरुवात करण्यात येत आहे.

काय आहेत दर?

24 स्क्वेअर फूटच्या स्क्रीनवर जाहिरात देण्यासाठी प्रत्येकी एका स्क्रीन साठी 2000 रु. दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये 1 दिवसात एकूण 33 मिनिटात 100 वेळा जाहिरात फ्लॅश केली जाईल तर 63 स्क्वेअर फूटच्या स्क्रीनसाठी प्रत्येकी एका स्क्रीन साठी 4000 रु. दर निश्चित करण्यात आला आहे. याही स्क्रीन वर 1 दिवसात 33 मिनिटात 100 वेळा जाहिरात फ्लॅश करण्यात येईल. याचबरोबर जाहिरातदाराना त्यांच्या गरजेनुसार पॅकेज उपलब्ध होऊ शकते. जाहिरातदाराना स्क्रीनच्या संख्येनुसार आणि गरजेनुसार पॅकेज देता येईल. पहिल्यांदाच हे डिस्प्ले जाहिरातींसाठी खुले करण्यात आले आहेत. या स्क्रीन साठी लागणारी विद्युत आणि नेटवर्क डेटा यांचा खर्च स्मार्ट सिटी द्वारे करण्यात येईल, अशी माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी दिली. जाहिराती देण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी 8055001551 ह्या नंबर वर कॉल करावा. या माध्यमातून शहरातील मुख्य चौकात बसवण्यात आलेल्या या डिस्प्लेच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल, असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

NEET PG Revised Cut Off : नीट पीजी परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार, आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

Rupali Chakankar | ‘विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत, म्हणूनच खालच्या पातळीवर जाऊन वारंवार टीका’