AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : महाविकास आघाडीला जेरीस आणणाऱ्या राणा दाम्पत्याला बच्चू कडू यांनी दिलं टेन्शन; काय म्हणाले बच्चू कडू?

कोणाचा बाप काढणे हे शोभणारे नाही. टीका करत असताना ते शस्त्र झाले पाहिजे. त्यामुळे लहान मुलासारखी टीका करू नये, असा टोला आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.

Bachchu Kadu : महाविकास आघाडीला जेरीस आणणाऱ्या राणा दाम्पत्याला बच्चू कडू यांनी दिलं टेन्शन; काय म्हणाले बच्चू कडू?
bacchu kadu Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2023 | 7:59 AM
Share

धाराशीव | 22 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार आणि तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांनीही एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली होती. बच्चू कडू हे सुद्धा सरकारमधून बाहेर पडले होते. नव्या सरकारमध्ये आपल्याला पहिल्याच फेरीत मंत्रीपद मिळेल असं बच्चू कडू यांनना वाटत होतं. तेही कॅबिनेट मंत्रीपद मिळेल असं बच्चू कडू यांना वाटत होतं. पण बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं नाही. दुसऱ्या विस्तारातही संधी नाकारण्यात आली. त्यामुळे आता मंत्रिपद मिळणार नसल्याची खात्री बच्चू कडू यांना पटली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू यांनी थेट लोकसभा आणि विधानसभेच्या किती जागा लढणार हेच जाहीर केलं आहे.

बच्चू कडू काल धाराशीवमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यांना टेन्शन देणारं विधान केलं आहे. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेवर दावा केला आहे. अमरावती लोकसभेच्या जागेवर बच्चू कडू यांनी दावा केल्याने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना टेन्शन आलं आहे. आम्ही अमरावतीची जागा लढवणार आहोत. त्यासाठी मी कुणाशी बोलणीबिलणी करत नसतो. पण गरज पडल्यास बोलणी होईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

बच्चू कडूंची मोठी ताकद

बच्चू कडू यांची अमरावतीत मोठी ताकद आहे. बच्चू कडू स्वत: अमरावती लोकसभेला उभे राहिल्यास किंवा इतर कुणाला त्यांनी उभं केल्यास त्याचा थेट परिणाम राणा दाम्पत्यावर होऊ शकतो. बच्चू कडू यांच्या या राजकीय खेळीमुळे राणा दाम्पत्याला अमरावती गमवावी लागू शकते. महायुतीत असूनही बच्चू कडू यांनी अमरावती लढण्यावर भर दिल्याने राणा दाम्पत्याची चिंता वाढली आहे. राणा दाम्पत्यांचं आणि बच्चू कडू यांच्यात फारसं पटत नाही. त्यांच्यात सतत वाद होत असतात. त्यामुळे बच्चू कडू राणा दाम्पत्यांसाठी अमरावतीतून माघार घेतली ही शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे.

15 जागा लढणार

दरम्यान, बच्चू कडू हे राज्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या 15 जागा लढवणार आहेत. तशी घोषणाच त्यांनी केली आहे. लोकसभेची एक जागा अमरावतीची आहे. दुसरी जागा बच्चू कडू यांनी अजून जाहीर केली नाही. तर विधानसभेच्या 15 जागा कोणत्या लढणार हेही त्यांनी गुपित ठेवलं आहे. मात्र, बच्चू कडू हे अकोला, अमरावती, नागपूर, मुंबई, ठाण्यातील काही जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना