‘निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई…’; अमोल मिटकरी यांनी थेट अंगाईतून टोला हाणला…

| Updated on: Jan 13, 2023 | 11:53 PM

शिक्षक आमदार निवडणुकीनिमित्त औरंगाबादमध्ये बावनकुळे यांची सभा होती. या सभेला भाजपचे अनेक नेते उपस्थित राहिले होते. त्यामुळे विरोधकांच्या इडिटेड व्हिडीओवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे.

निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई...; अमोल मिटकरी यांनी थेट अंगाईतून टोला हाणला...
Follow us on

मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणावेळी नेत्यांना झोप अनावर झाल्याचा व्हिडीओ अमोल मिटकरी यांनी ट्विट केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कुणाला डुलकी आलीय., तर कुणी जांभई देतंय. पण हा व्हिडीओ इडिटेल असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष भाषण करत होते, आणि दुसरीकडे मंचावरच्या काही नेत्यांना झोप अनावर झाली होती. त्यामुळे त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई…आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही अशी अंगाई गाऊन चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे.

या सभेत कुणी जांभई दिली आहे तर कुणाला डुलकी लागली आहे. तर कुणाला झोप अनावर झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिक्षक आमदार निवडणुकीनिमित्त औरंगाबादमध्ये बावनकुळे यांची सभा होती. या सभेला भाजपचे अनेक नेते उपस्थित राहिले होते. त्यामुळे विरोधकांच्या इडिटेड व्हिडीओवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे.

मात्र त्यानंतर तो व्हिडीओ तपासून पाहावा लागणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे नेत्यांच्या झोपेबद्दल आमदार रवी राणा यांनी आपला पक्ष सोडून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवर त्यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी यांनी भाजपच्या सभेतील डुलकी घेणाऱ्या नेत्यांच्या या व्हिडीओवरून आता राजकारण चांगलंच तापलं असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा व्हिडीओ आधी तपासून बघावा लागेल असंही त्यांनी म्हटले आहे.

भाजपच्या सभेतील डुलकी घेणाऱ्या नेत्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर झोपेलेलं सरकार असं म्हणून निशाणा साधला आहे.

तर त्यांच्या या टीकेवर आमदार रवी राणा यांनी अमोल मिटकरी यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्ष झोपले असल्यानेच तुमच्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहे असा टोला लगावला आहे.