Fraud: सख्ख्या भावानेच 2 कोटी 11 लाखांना फसवले, सेवानिवृत्त अधीक्षकांचा आरोप, तिघांवर गुन्हा दाखल

या फसवणुकीच्या या प्रकरणात उत्तम भिसूजी जाधव, कमलाबाई उत्तम जाधव, नितीन उत्तम जाधव, अॅड. रमेश काशिनाथ पाटील आणि अॅड छाया प्रशांत देशमुख अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी नितीन हा यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल आहे. उत्तम हे सेवानिवृत्त अधीक्षक हिरासिंग जाधव यांचे बंधू आहेत.

Fraud: सख्ख्या भावानेच 2 कोटी 11 लाखांना फसवले, सेवानिवृत्त अधीक्षकांचा आरोप, तिघांवर गुन्हा दाखल
इंदापूरमधील भिशी फसवणूक आकडा तब्बल 200 कोटींवर
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 6:16 PM

औरंगाबादः शहरातील सेवानिवृत्त पोलीस (police superintendent) अधीक्षक हिरासिंग भिसूजी जाधव यांना त्यांच्या सख्ख्या भावानेच तब्बल दोन कोटी रुपयांना फसवल्याचा (Aurangabad fraud) प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या भावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 प्रकल्पाकरिता संपादित झालेल्या जमिनीचा मावेजा हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल (Aurangabad crime) करण्यात आला आहे.

उमरखेड येथून रक्कम हडप केली

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरासिंग जाधव यांची मूळ गाव भोसा आणि तिवरंगा येथे शेती, घर अशी मिळकत आहे. त्यांचे मोठे बंधू उत्तम जाधव, भावजय कमलाबाई, पुतवण्या नितीन यांनी अॅड. रमेश पाटील व छाया देशमुख यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 या प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचा दोन कोटी 11 लाख 32 हजार 764 रुपये मावेजा उचलला. यवतमाळमधील उमरखेड येथून ही रक्कम हडप केली, असे फिर्यादित म्हटले आहे.

पाच जणांवर गुन्हे दाखल

या फसवणुकीच्या या प्रकरणात उत्तम भिसूजी जाधव, कमलाबाई उत्तम जाधव, नितीन उत्तम जाधव, अॅड. रमेश काशिनाथ पाटील आणि अॅड छाया प्रशांत देशमुख अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी नितीन हा यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल आहे. उत्तम हे सेवानिवृत्त अधीक्षक हिरासिंग जाधव यांचे बंधू आहेत. सदर प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाने करीत आहेत.

इतर बातम्या-

औरंगाबादः लेबर कॉलनीतील जीर्ण घरे पाडणारच, कागदपत्रे जमा करण्यासाठी संध्याकाळपर्यंतची मुदत, पर्यायी घरांचा विचार

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, मराठवाड्यात 120 जणांचे निलंबन, नादेंडमध्ये सर्वाधिक 58 जणांवर कारवाई