“मस्ती गाडण्यासाठी वज्रमूठ उभी केली”; उद्धव ठाकरे विरोधकांवर कडाडले…

| Updated on: Apr 02, 2023 | 9:06 PM

उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना त्यांनी अनेक मुद्यावरून घेरले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही त्यांनी विरोधकांवर त्यांनी सडकून टीका केली आहे.

मस्ती गाडण्यासाठी वज्रमूठ उभी केली; उद्धव ठाकरे विरोधकांवर कडाडले...
Follow us on

औरंगाबाद : रत्नागिरी आणि मालेगावमध्ये झालेल्या अलोट गर्दीनंतर उद्धव ठाकरे यांची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांना शिंदे गटावर वार करत त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला.  उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांचा कसा मांडला होता हे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. संभाजीनगरमध्ये होत असलेली वज्रमूठ सभा का घेत आहे तर भाजपच्या हुकुमशाहीविरुद्ध एकजूटीची ही वज्रमूठ बांधली असल्याचा  थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.

महाविकास आघाडीची वज्रमूठ ही संयुक्त सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अलोट गर्दीत झाली. या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ही सभा का घेत आहे हेही उद्धव ठाकरे यांना आपल्या भाषणात विरोधकांना ठणकावून सांगितले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देत 1988 साली आपण महापालिका शिवसेनेच्या हाती दिल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर करतो आहे असंही त्यांनी म्हटले होते असा टोला त्यांनी शिंदे गटाला आणि भाजपला लगावला आहे. मात्र गेल्या आपण 25 वर्षे भ्रमात होतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, दोनवेळा आपले सरकार आले मात्र दोन्ही वेळेला केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार होतं. मात्र औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर झाले नव्हते.

त्यामुळे मी मविआच्या सहकाऱ्यांना धन्यवाद मानतो की त्यांनी ते करुन दाखवलं. यावरुन त्यांची वृत्ती समजून आलीय. निवडणुका आली की जातीय तेढ निर्माण करायची असा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.

ज्यावेळेला जातीय तेढ निर्माण होईल तेव्हा समजून जायचं की निवडणुका जवळ आल्या आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, तुमच्यामध्ये मस्ती असल्यामुळे ती गाढण्यासाठी वज्रमूठ उभारली आहे असा टोलाही त्यांना भाजपला लगावला आहे.

आजच्या काळात लाखो युवक सुशिक्षित आहेत, मात्र अनेकांची परिस्थिती बेताची आहे. राज्यातील अनेकाने कर्ज काढून पदवी मिळवेलेली आहे. सध्या डॉक्टरेटही विकत घेता येते असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना त्यांनी अनेक मुद्यावरून घेरले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही त्यांनी विरोधकांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. मी जर काँग्रेसबरोबर जात असेल आणि म्हणून जर हिंदुत्व सोडले असा तुम्ही कांगावा करत असाल तर तुम्ही मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सरकार बनवलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का? असा सवाल त्यांनी भाजपला केला.