मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मोठी घोषणा? काय करणार घोषणा?; शिरसाट यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

| Updated on: Sep 03, 2023 | 1:50 PM

संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. इंडिया आघाडीच्या बैठकीत चमत्कार झालाय का? उद्धव ठाकरेंचा हाताची घडी घालून फोटो पाहायला मिळाला. हे शिवसेनाप्रमुखांना कधीच अपेक्षित नव्हतं, असा टोला त्यांनी लगावला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मोठी घोषणा? काय करणार घोषणा?; शिरसाट यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद | 3 सप्टेंबर 2023 : जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या लाठी हल्ल्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळले जात आहेत. तर काही ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे. काही भागात बंद पुकारण्यात आला आहे. तर अनेक भागात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांची आज औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जालन्यातील घटनेवर चर्चा झाली. या भेटीनंतर संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री आज एखादी घोषणा करण्याची शक्यता आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी उद्या देखील मुंबईत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार? अचानक घोषणा करण्याचं कारण काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

तर राऊत त्या कटात

संजय शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. लाठीमार करण्यासाठी मंत्रालयातून जर फोन आला असेल तर संजय राऊत यांनी तातडीने मीडियासमोर सांगितलं पाहिजे. कुणी फोन केला? कशासाठी केला? याची माहिती राऊतांनी दिली पाहिजे. त्यांनी हवेत बोलू नये. नाही तर त्या कटात राऊतही सहभागी होते असा त्याचा अर्थ होईल, असा टोला शिरसाट यांनी लगावला. राऊत यांनी बेछूट आरोप करू नये. त्यापेक्षा त्यांनी वस्तूस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्याचा संबंध नाही

जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होता म्हणूनच आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या आरोपात काही तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. शासन आपल्या दारी हा वेगळा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम महिनाभरापासून ठरलेला असतो. त्याचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.