शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नका; अन्यथा तीव्र आंदोलन, प्रशांत बंब यांचा इशारा

| Updated on: Dec 17, 2021 | 2:12 PM

शेतकऱ्यांकडील थकित वीजबिलाच्या वसुलीला महावितरणने सुरुवात केली आहे. जे शेतकरी वीजबिल भरणार नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी महावितरण विभागाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नका; अन्यथा तीव्र आंदोलन, प्रशांत बंब यांचा इशारा
प्रशांत बंब
Follow us on

औरंगाबाद : शेतकऱ्यांकडील थकित वीजबिलाच्या वसुलीला महावितरणने सुरुवात केली आहे. जे शेतकरी वीजबिल भरणार नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी महावितरण विभागाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरू करा, अन्यथा आंदोलन करू असे प्रशांत बंब यांनी म्हटले आहे.

फक्त चालू बिलाची वसुली करावी

प्रशांत बंब पुढे बोलताना म्हणाले की, महावितरणने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, त्यांच्याकडून फक्त चालू महिन्याचे वीजबिल आकारले जावे, थकित वीजबिलासाठी त्यांच्या मागे तगादा लावू नये. थकित वीजबिल न भरल्यास कोणत्याही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा बंब यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महावितरणला दिला आहे.

वीजबिल वसुली मोहिमेमुळे शेतकरी अडचणीत

दरम्यान दुसरीकडे महावितरणच्या वसुली मोहिमेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासूनचे वीजबिल थकले आहे. ही रक्कम काही लाखांच्या घरात जाते. एवढे सगळे बिल एकाच वेळी कसे भरायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर दुसरीकडे थकित वीजबिल न भरल्यास महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेल्या पिकाला पाणी कसे द्यायचे याची चिंता बळीराजाला सतावरत आहे.

संबंधित बातम्या 

106 नगर पंचायती आणि दोन जिल्हा परिषदेच्या स्थगित निवडणुका, अखेर पुढच्या वर्षीचा मुहूर्त

OBC Reservation: इम्पिरिकल डेटा येईपर्यंत निवडणुका घेऊ नका; पंकजा मुंडे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मोठी बातमीः OBC आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची भाजपची मागणी, शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात