AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमीः OBC आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची भाजपची मागणी, शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची मागणी करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले आहे. या शिष्टमंडळात पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांचा समावेश आहे.

मोठी बातमीः OBC आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची भाजपची मागणी, शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात
भाजपचे शिष्टमंडळ विनंतीसाठी निवडणूक कार्यालयात
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 1:31 PM
Share

मुंबईः ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची मागणी करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यालयात गेले आहे. या शिष्टमंडळात पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आशिष शेलार यांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयुक्तांना केली. यावर आता निवडणूक आयोगाची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी मागणी सर्वच पक्षांमधून जोर धरत आहे.

ही निवडणूक प्रक्रियाच चुकीची- पंकजा मुंडे

महाराष्ट्रातील 105 नगरपंचायतींच्या निवडणूका 21 डिसेंबर रोजी होत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 27 टक्के ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. मात्र कोर्टाचा निकाल येण्यापूर्वीच निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता ही पूर्ण प्रक्रियाच चुकीची ठरू शकते. ओबीसींनी फक्त आरक्षित जागांसाठी अर्ज भरले असून खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे ओबीसींना आता खुल्या प्रवर्गातूनही अर्ज भरण्यास संधी मिळत नाही, हा अन्याय असून तो असह्य आहे. निवडणूक आयोगाने यावर तत्काळ स्पष्टता केली आहे, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच राज्य सरकार, तसेच विविध राजकीय नेत्यांनी ओबीसींवर अन्याय होऊ नये, या मागणीसाठी तत्काळ कोर्टात धाव घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

इतर बातम्या-

धक्कादायक! ओबीसींची जनगणनाच झाली नाही, केंद्राचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्रं; भुजबळांचा दावा

Vaccination: बोगस प्रमाणपत्र देणारे आणखी एक रॅकेट औरंगाबादेत उघड, ओम्नी व्हॅनमध्ये फसवेगिरीचा कारखाना!

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.