PHOTO: ईद-ए-मिलाद निमित्त सजले औरंगाबाद, ऐतिहासिक दरवाजे, रस्ते, चौकांत विद्युत रंगांची उधळण

| Updated on: Oct 19, 2021 | 6:21 PM

1 / 5
ईद-ए-मिलाद निमित्त औरंगाबादची ऐतिहासिक ओळख असलेल्या अनेक दरवाजे. शहरातील चौक, दर्गा तसेच रस्त्यांवर  रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मोतीकारंजा येथील ख्वाजा मोइनुल्ला शाह दर्ग्याचे हे छायाचित्र. याचप्रमाणे रोशन गेट, किराडपुरा, बायजीपुरा, सिटी चौक, बुढीलेन, शहागंज आदी भागांमध्ये तसेच रोशन गेट, कटकट गेट या ऐतिहासिक दरवाज्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

2 / 5
शहरातील मोतिकारंजा येथील विद्युत रोषणाईचे विहंगम दृश्य टिपले आहे शहरातील मुक्त छायाचित्रकार अदनान रफी यांनी .

3 / 5
ईद-ए-मिलाद निमित्त बच्चे कंपनीतही आनंद दिसून येत आहे. आज औरंगाबादमधील विविध गल्ल्यांमध्ये लहान मुले एकत्र येऊन हा सण साजरा करताना दिसून आले. शहरात झेंडे, टोप्या, लायटिंग, बॅच आदींच्या खरेदीचा उत्साहही दिसून आला.

4 / 5
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. पैगंबर या महानभूतीला प्रत्‍यक्षात अल्‍लाने भेट दिलेला पवित्र पोशाख आणि त्‍यांच्‍या मिशीचा केस आजही औरंगाबाद जिल्‍ह्यातील खुलताबाद येथील एका दर्गात सुरक्षित ठेवलेला आहे. वर्षातून केवळ ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशीच तो दर्शनासाठी खुला केला जातो. 18 ऑक्टोबर रात्रीपासूनच खुलताबाद येथे   पोशाख दर्शनासाठी भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे.

5 / 5
 जमात-ए-इस्लामी हिंद औरंगाबाद शाखेतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतले जाते. घाटी रुग्णालयासाठी हे रक्त संकलन केले जाते. यावर्षी जवळपास 600 पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले.