औरंगाबाद जिल्ह्यात गणेशोत्सवात मिरवणुकांना मज्जाव, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्या महाप्रसाद वाटप आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमांनाही बंदी

| Updated on: Sep 08, 2021 | 5:29 PM

गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे असल्यास स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत/ नगरपरिषद यांच्याद्वारे उपलब्ध वाहनातच एकत्रित मूर्ती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विसर्जनासाठी घराबाहेर न पडता सदरच्या वाहनात गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी जमा करावी.

औरंगाबाद जिल्ह्यात गणेशोत्सवात मिरवणुकांना मज्जाव, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्या महाप्रसाद वाटप आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमांनाही बंदी
गणेश चतुर्थीला अवश्य करुन पहा या 5 फ्युजन पाककृती
Follow us on

औरंगाबाद: येत्या शुक्रवारी गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे दाट सावट होते. यंदा मात्र त्यात काहीशी शिथिलता आली आहे. तरीही सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना कोणत्या सूचना आणि निर्देशांचे पालन करायचे याबाबत मार्गदर्शिका नुकतीच जारी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत होत असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसार गणपतींची स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच औरंगाबादमधील ग्रामीण पोलिस विभागातर्फे (Aurangabad Rural Police) आणखी काय नियमावली देण्यात आली आहे, ते पाहुयात-

  1. पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करणे सर्वात चांगले.
  2. गणेशमूर्ती घरी आणण्याकरिता किंवा विसर्जन करण्यासाठी कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही.
  3.  मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक महाप्रसाद वाटप, भंडारा यासारखे लोकसमुहांचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
  4.  भजन, कीर्तन, आरती व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

स्थानिक प्रशासनाच्या वाहनातच विसर्जन

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे असल्यास स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत/ नगरपरिषद यांच्याद्वारे उपलब्ध वाहनातच एकत्रित मूर्ती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विसर्जनासाठी घराबाहेर न पडता सदरच्या वाहनात गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी जमा करावी. शक्य असल्यास वैज्ञानिक पद्धतीने घरच्या घरीच मूर्तींचे विसर्जन करण्यावर भर द्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन स्पर्धा घेतल्या जाव्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करतानाच हा गणेशोत्सव आनंददायी व जल्लोषपूर्ण होण्यासाठी औरंगाबाद ग्रामीम जिल्हा पोलिस दलातर्फे ऑनलाइन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यात रांगोळी, निबंद, सेल्फी विथ ट्री, चित्रकला, एकपात्री नाटक, संदेशात्मक देखावे अशा श्रेणींमध्ये स्पर्धक ऑनलाइन स्पर्धेकरिता सहभाग नोंदवू शकतात.

एक गाव एक गणपतीस प्रोत्साहन

ग्रामीण जिल्हा पोलिस दलातर्फे एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी या संकल्पनेतून 280 गणपती बसवण्यात आले होते. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवत इतरही गावांनी याच पद्धतीने गणपती बसवावे, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान कायदा व शांततेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या- 

Ganesh Chaturthi 2021 | भगवान गणेशाच्या या 108 नावांचा जप करा, विघ्नहर्ता सर्व विघ्न दूर करतील

Ganesh Chaturthi 2021 | श्रीगणेशाच्या आगमनावेळी अक्षतांचा वापर का केला जातो? जाणून घ्या