AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2021 | श्रीगणेशाच्या आगमनावेळी अक्षतांचा वापर का केला जातो? जाणून घ्या

गजानन गणपतीला समर्पित 10 दिवसांचा महापर्व गणेशोत्सव येणार आहे. हा सण शुक्रवार 10 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 19 सप्टेंबर रविवारी अनंत चतुर्थीपर्यंत सुरु राहील. दरवर्षी हा गणेशोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या उत्सवाबद्दल जास्तीत जास्त धूम असते. चतुर्थीच्या दिवशी गणपती भक्त ढोल-ताशांच्या गजरात आपल्या घरी घेऊन येतात.

Ganesh Chaturthi 2021 | श्रीगणेशाच्या आगमनावेळी अक्षतांचा वापर का केला जातो? जाणून घ्या
Bhagvan Ganesh
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 8:20 PM
Share

मुंबई : गजानन गणपतीला समर्पित 10 दिवसांचा महापर्व गणेशोत्सव येणार आहे. हा सण शुक्रवार 10 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 19 सप्टेंबर रविवारी अनंत चतुर्थीपर्यंत सुरु राहील. दरवर्षी हा गणेशोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या उत्सवाबद्दल जास्तीत जास्त धूम असते. चतुर्थीच्या दिवशी गणपती भक्त ढोल-ताशांच्या गजरात आपल्या घरी घेऊन येतात.

यानंतर घरात गणपतीला घरात विराजमान केले जाते. श्रद्धेनुसार लोक 5, 7 किंवा 9 दिवस घरी गणपती बसवतात. या दरम्यान त्यांची खूप सेवा केली जाते. पूजा केली जाते आणि त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण केले जातात. गणपतीच्या पूजेत अक्षतांचे विशेष महत्त्व आहे. ज्यावेळी गणेशाला घरी आणले जाते त्यावेळी एक विशेष पूजेचं आयोजन केले जाते. यादरम्यान, हळदी आणि कुंकू मिसळलेल्या अक्षतांनी गणपतीचे स्वागत केले जाते. तसेच, चतुर्थीच्या दिवशी दुपारची वेळ गणपतीच्या पूजेसाठी उत्तम मानली जाते. हे का केले जाते ते येथे जाणून घ्या –

अक्षतांचा वापर का केला जातो?

गणपती हा सुखकर्ता मानला जातो आणि अक्षता हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की गणपतीच्या आगमनावेळी जर त्याला अक्षता म्हणजेच तांदूळ अर्पण केले गेले तर त्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात शुभतेसह समृद्धी देखील येते. याशिवाय, असेही मानले जाते की अक्षता अर्पण केल्याने गणपतीसह सर्व देव-देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सकारात्मकता येते.

अक्षतांना कधीही पांढऱ्या अर्पण करु नये, म्हणून त्यात हळद किंवा कुंकु मिसळले जाते. यावेळी जर तुम्ही देखील तुमच्या घरात गणपती आणण्याची तयारी करत असाल तर हळद किंवा कुंकुमध्ये अक्षता मिसळून गणपतीचे स्वागत करा. तसेच, मिक्स करताना तांदुळ तुडणार नाही याची काळजी घ्या. कारण पूजेमध्ये नेहमी अख्ख्या अक्षतांचा वापर करावा .

दुपारची वेळ पूजेसाठी सर्वोत्तम

गणेश चतुर्थीचा दिवस गणपतीची जयंती म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला दुपारच्या वेळी गणपतीचा जन्म झाल्याचे मानले जाते. साधारणपणे मंदिरामध्ये रात्री 12 नंतर पूजा केली जात नाही, परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारची वेळ ही गणपतीच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. चतुर्थीच्या दिवशी गणेशस्थापनेचा शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 17 मिनिटांपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल. पण, तुम्ही फक्त दुपारी गणपतीची स्थापना करा आणि त्यांना दुर्वा, सुपारी, शेंदूर, अक्षता इत्यादी अर्पण करा. तसेच, त्याचे आवडते नैवेद्य बनवा. त्यानंतर त्यांची स्तुती करा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

गणेश चतुर्थीपूर्वी चोर गणपतीची प्रतिष्ठापना, सांगलीतील दोनशे वर्ष जुनी परंपरा

PHOTO | कोरोनाच्या नियमांना बगल देण्यासाठी चाकरमन्यांची शक्कल, गणेशोत्सवासाठी आठवडाभर आधीच कोकणात दाखल

Follow Us
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम