गणेश चतुर्थीपूर्वी चोर गणपतीची प्रतिष्ठापना, सांगलीतील दोनशे वर्ष जुनी परंपरा

श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो.

गणेश चतुर्थीपूर्वी चोर गणपतीची प्रतिष्ठापना, सांगलीतील दोनशे वर्ष जुनी परंपरा
Sangli Chor Ganpati
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 11:36 AM

सांगली : गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर चोर गणपती प्रतिष्ठापना केली जाते. चोर गणपती बसवण्याची सांगली येथे शतकाची परंपरा आहे. आज सांगलीच्या गणपती मंदिरात चोर गणपतीची प्रतिष्ठापित झाली.

श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची  परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. मात्र, कोरोनाच्या या महामारीत मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाप्पाचे बाहेरुनच दर्शन घेतले.

चार दिवसांपूर्वीच आगमन, कोणालाही माहिती न पडू देता स्थापना

गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र चार दिवस अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीमध्ये गेल्या दोनशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली गेली आहे. तर हा गणपती दीड दिवस असतो. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही जतन केले जाते. या मूर्तीला सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते.

नवसाला पावणारा गणपती

या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते. या ठिकाणी पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिध्द असून हा नवसाला पावणारा गणपती आहे. या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्म ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र, कोरोनाच्या काळात गेले दोन वर्षे झाले कोणतेही धार्मिक कार्यक्रम झाले नाहीत. यंदा ही भक्तांना लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे.

संबंधित बातम्या :

Ganesh Chaturthi 2021 : गणपतीला का प्रिय आहे मोदक, जाणून घ्या काय आहे मान्यता !

PHOTO | पाचवा श्रावणी सोमवार निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.