Ganesh Chaturthi 2021 : खास गणेशोत्सवासाठी घरी नारळ आणि गुळापासून बनवलेले मोदक तयार करा, पाहा रेसिपी !

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाला होता. गणपतीची जयंती गणेश महोत्सव म्हणून भारताच्या सर्व भागात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा उत्सव 10 दिवसांचा असतो आणि गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत चालू राहतो.

Ganesh Chaturthi 2021 : खास गणेशोत्सवासाठी घरी नारळ आणि गुळापासून बनवलेले मोदक तयार करा, पाहा रेसिपी !
मोदक रेसिपी

मुंबई : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाला होता. गणपतीची जयंती गणेश महोत्सव म्हणून भारताच्या सर्व भागात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा उत्सव 10 दिवसांचा असतो आणि गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत चालू राहतो. या दरम्यान, गणपतीची मूर्ती भव्यतेने आणतात आणि घरात बसवतात. गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर दुर्वा, पान, अक्षत, सिंदूर, फुले इत्यादी अर्पण करून रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते. (Ganesh Chaturthi 2021 special Recipe make coconut and jaggery modak at home for ganpati during ganesh festival)

या दरम्यान, गणपतीच्या प्रसादामध्ये मोदक असतात. यावेळी गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी आहे आणि हा सण 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत चालू राहील. जर तुम्हीही या वेळी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तुमच्या घरी आणत असाल तर त्याचे आवडते मोदक घरी बनवा आणि अर्पण करा. येथे जाणून घ्या गूळ आणि नारळापासून बनवलेल्या खास मोदकांची रेसिपी.

साहित्य : दोन वाट्या तांदळाचे पीठ, दीड वाटी किसलेला गूळ, दोन कप नारळाचा किस, अर्धा चमचा वेलची पूड, एक चमचा खसखस, काजू, बदाम आणि मनुके आणि एक चमचे तूप.

तयार करण्याची पध्दत

सर्वप्रथम, खसखस ​​एका तासासाठी पाण्यात भिजवून बारीक करून घ्या. यानंतर, एका पॅनमध्ये दीड कप किसलेला गूळ आणि दोन कप नारळ घाला, ते चांगले गरम करा आणि चमच्याने हलवा जोपर्यंत दोन्ही चांगले मिसळत नाहीत. मिक्स केल्यानंतर, जेव्हा हे मिश्रण घट्ट होईल, तेव्हा काजू, बदाम, मनुका, खसखस ​​आणि वेलची वगैरे घालून सर्व गोष्टी मिक्स करा. यानंतर ते एका प्लेटमध्ये ठेवा आणि थंड होऊ द्या.

आता दोन कप पाण्यात एक छोटा चमचा तूप घालून ते गरम करा आणि पाणी उकळताच गॅस बंद करा. एका वाडग्यात दोन कप तांदळाचे पीठ ठेवा आणि थोडे थोडे गरम पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर, पीठ सुमारे 10 मिनिटे झाकून ठेवा. 10 ते 15 मिनिटांनंतर हाताला तूप लावून मोदक तयार करा.

जर आपल्याला मोदक हाताने तयार करा येत नसतील तर आपण त्यासाठी साचा देखील वापरू शकता. पण ते वापरण्यापूर्वी त्यात तूप लावायला विसरू नका. सर्व मोदक तयार झाल्यावर एका रुंद भांड्यात दोन छोटे ग्लास पाणी घालून ते गरम करून त्यावर जाळीचा स्टँड लावा. मोदक जाळीवर ठेवा, झाकून ठेवा आणि 10 ते 15 मिनिटे वाफेवर शिजवा. शिजल्यानंतर मोदकाचा रंग बदलेल. यानंतर, त्यांना एका प्लेटमध्ये बाहेर काढा आणि थंड झाल्यावर गणपतीला अर्पण करा आणि घरातील सर्व सदस्यांना मोदक प्रसाद म्हणून खायला द्या.

संबंधित बातम्या : 

Janmashtami Recipe 2021 : जन्माष्टमीच्या दिवशी ‘हे’ स्वादिष्ट गोड पदार्थ बनवा, पाहा रेसिपी!

(Ganesh Chaturthi 2021 special Recipe make coconut and jaggery modak at home for ganpati during ganesh festival)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI