Uddhav Thackeray: हिंमत असेल तर काश्मिरात जाऊन हनुमान चालिसा म्हणा, शिवसेनाप्रमुखांनी मुस्लीम द्वेष शिकवला नाही… उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, भाजपावर हल्लाबोल

एकदा शिवसेना आणि भाजपाने हिंदुत्वाने काय केले, याचे एकदा समोरासमोर करुच, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा मुसलमान द्वेष करा असं कधीही सांगितलं नाही.असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर काश्मिरात जाऊन हनुमान चालिसा म्हणा, शिवसेनाप्रमुखांनी मुस्लीम द्वेष शिकवला नाही... उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, भाजपावर हल्लाबोल
Uddhav on Hanuman chalisa
Image Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 8:54 PM

औरंगाबाद – काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandit)पुन्हा घरं सोडली आहेत… घरात, शाळेत जाऊन गोळ्या घातल्या जात आहेत. हिंमत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचा… मर्द असाल तर पहिले काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा. असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज ठाकरे आणि भाजपाला दिले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाने काय केले, असा सवाल त्यांनी केला आहे. एकदा शिवसेना आणि भाजपाने हिंदुत्वाने काय केले, याचे एकदा समोरासमोर करुच, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा मुसलमान द्वेष करा असं कधीही सांगितलं नाही. शिवाजी महाराजांनीही अन्य धर्माचा आदर केला आहे. बाळासाहेबांनीही हा देश हाच माझा धर्म म्हणून बाहेर पडण्यास सांगितलं. असेही उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले.

मुद्याचे सोडून भलत्याच विषयांची चर्चा

रुपया खाली घसरतोय, पण आम्हाला चिंता कोणती तर कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे. आमचं हिंदुत्व मोजण्याची मोजपट्टी तुम्हाला कुणी दिली? चला होऊन जाऊद्या… शिवसेनेनं हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपनं काय केलं हे एकदा खुल्या मंचावर होऊन जाऊ द्या… आता फडणवीस सांगत आहेत बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते… मग मला सांगा संभाजीनगरचे मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते का… असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला आहे. अमरनाथ यात्रेवर गंडांतर आलं, काश्मिरी पंडितांच्या मागे शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते तर दिल्लीच्या तख्तावर आज तुम्ही हिंदुत्वाच्या जोरावर बसले असता काय? असा वाल त्यांनी उपस्थित केलाय.

मुसलमानांचा द्वेष करा, असे बाळासाहेबांनी शिकवले नाही

शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा मुसलमान द्वेष करा असं कधीही सांगितलं नाही. शिवाजी महाराजांनीही अन्य धर्माचा आदर केला आहे. बाळासाहेबांनीही हा देश हाच माझा धर्म म्हणून बाहेर पडण्यास सांगितलं. पण धर्माच्या नावाने आमच्या अंगावर कुणी आला तर सोलल्याशिवाय राहणार नाही. असेही त्यांनी सांगितले.