Bus Accident | मध्य प्रदेशातील बस दुर्घटनेत औरंगाबादच्या नागरिकाचा मृत्यू, पैठण तालुक्यातील जगन्नाथ जोशी होते एक प्रवासी!

| Updated on: Jul 18, 2022 | 7:47 PM

मध्य प्रदेशातून निघालेल्या बसला अपघात झाल्यानंतर काही मृतांची ओळख पटली आहे. यात पैठणच्या जगन्नाथ जोशी यांशी यांचाही समावेश आहे.

Bus Accident | मध्य प्रदेशातील बस दुर्घटनेत औरंगाबादच्या नागरिकाचा मृत्यू, पैठण तालुक्यातील जगन्नाथ जोशी होते एक प्रवासी!
मध्य प्रदेशातील बस दुर्घटनेत पैठण येथील जगन्नाथ जोशी यांचा अपघाती मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः मध्य प्रदेशातील इंदोरकडून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे येणाऱ्या बसला (MP Bus Accident) आज सकाळी भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशातील धार येथे उंच पुलावरून ही बस नदीत कोसळली. यात जवळपास 12 प्रवाशांचा करुण अंत झाल्याची माहिती आहे. या प्रवाशांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) एका नागरिकाचाही समावेश होता. पैठण (Paithan) तालुक्यातील जगन्नाथ जोशी हे या बसमध्ये होते. या दुर्दैवी घटनेत जगन्नाथ जोशी यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे वृत्त कळाल्यावर जोशी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पैठण तालुक्यातील पाचोड गावावर सध्या शोककळा पसरली आहे.

काय घडली घटना?

इंदोर अमळनेर ही अमळनेर आगाराची बस सकाळी साडे सात वाजता इंदोरहून निघाली. दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी दरम्यान नर्मदा नदीच्या पुलावर सदर बसला अपघात झाला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्यसाठी विनंती केली. स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचाव कार्यात 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून अजूनही शोध मोहिम सुरु आहे.

दुर्घटनेतील मयतांची नावे पुढीलप्रमाणे

  • चंद्रकांत पाटील (45 चालक)
  • प्रकाश चौधरी (वाहक),
  • अविनाश परदेशी
  • राजू तुलसीराम (35)
  • जगन्नाथ जोशी (68)
  • चेतन जागीड
  • लिम्बाजी खाती
  • सैफउद्दीन अब्बास अली बोहरा
  • कल्पना पाटील (57)
  • विकाश बेरहे (33)
  • आरवा मुर्ताजा बोहरा (27)
  • रुक्मिणीबाई जोशी

जनन्नाथ जोशी पैठणचे…

मध्य प्रदेशातून निघालेल्या बसला अपघात झाल्यानंतर काही मृतांची ओळख पटली आहे. यात पैठणच्या जगन्नाथ जोशी यांशी यांचाही समावेश आहे. राजस्थानमधून पाचोडकडे येत असताना या बसमध्ये जगन्नाथ जोशी हेदेखील होते. धार येथील दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जोशी यांच्या नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.