गोदामाईला संक्रांतीचं वाण, पैठणमध्ये संत एकनाथांच्या पत्नी गिरिजाबाईंपासून चालत आलेली परंपरा काय?

| Updated on: Jan 15, 2022 | 1:25 PM

गोदावरी नदीच्या काठावरच महिला एकमेकिंना हळदी-कुंकू देऊन नदीलाही वाण अर्पण करतात. काल मकर संक्रांतीनिमित्त पैठणमधील गोदावरीचा नदीच्या काळावर महिलांनी याच पद्धतीने हा सण साजरा केला.

गोदामाईला संक्रांतीचं वाण, पैठणमध्ये संत एकनाथांच्या पत्नी गिरिजाबाईंपासून चालत आलेली परंपरा काय?
गोदावरी नदीच्या तीरावर पैठणमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह
Follow us on

औरंगाबादः राज्यात सर्वत्र संक्रांतीनिमित्त (Makar Sankrant) महिलांनी एकमेकींना सुगड्याचं वाण देत हळदी-कुंकवाचा सण साजरा केला. पैठणमध्येही महिलांनी संत एकनाथ मंदिराच्या बाहेर एकत्र जमत संक्रांत साजरी केली. पैठणमध्ये हा सण साजरा करण्याची महिला वर्गाची वेगळी परंपरा आहे. आपली आई गोदामायच्या काठावर महिला जमतात. गोदावरी नदीच्या काठावरच महिला एकमेकिंना हळदी-कुंकू देऊन नदीलाही वाण अर्पण करतात. काल मकर संक्रांतीनिमित्त पैठणमधील गोदावरीचा नदीच्या काळावर महिलांनी याच पद्धतीने हा सण साजरा केला.

काय आहे 450 वर्षांची परंपरा?

पैठणमधील मकर संक्रांतीच्या परंपरेविषयी अधिक माहिती देताना येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीक  म्हणाले, नाथांच्या वाड्यात संत एकनाथांच्या पत्नी गिरिजाबाई यांच्यासोबत मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी महिला वर्ग जमत असे. यावेळी महिला गोदावरी नदीच्या तीरावरही जात असत. महिलांनी त्यावेळी गिरिजाबाईंना उखाणा घ्यायला लावला होता. तेव्हापासून आजपर्यंत गोदामाईला वाण समर्पित केल्यानंतर महिला एकमेकिंना उखाण्यातून पतीचे नाव घेण्याचा आग्रह धरतात. ती परंपरा आजी

संत एकनाथांचे मंदिर बंद, महिलांची नाराजी

कोरोना संसर्गामुळे पैठण येथील संत एकनाथांचे मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महिला वर्गात मोठी नाराजी दिसून आली. या मंदिरातच संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू साजरी करण्याची परंपरा आहे. राज्यातील इतर मंदिरं सुरु असताना पैठण येथील मंदिरच का बंद केले, असा सवाल महिलांनी केला. मात्र या वर्षी मंदिर बंद असल्याने मंदिराबाहेरच महिलांनी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला.

देवाला साकडं- कोरोना जावो, समाज सुखी राहो

पैठणमधील रंगारहट्टी वॉर्डातील ऋणानुबंध महिलामंडळाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता मकर संक्रांत सण साजरा केला.  कोरोना जावो – समाज सुखी राहो अशी आराधना करून एकमेकींना शुभेच्छा देत महिला वर्गाने एकमेकींना हळदी-कुंकू दिले.

इतर बातम्या-

VIDEO: काँग्रेसला गोव्यात 40 पैकी 45 जागा मिळतील, महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा सणसणीत टोला

NIT | नागपुरात लीजवर दिलेली जमीन विकली; एनआयटीची बिल्डरकडून कशी झाली फसवणूक?