Omicron in Aurangabad: औरंगाबादेत ओमिक्रॉनचा शिरकाव, इंग्लंड, दुबईहून आलेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह!

| Updated on: Dec 25, 2021 | 4:23 PM

औरंगाबाद शहरात अखेर ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचे निष्पन्न झाला आहे. इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या व्यक्तींचे अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत.

Omicron in Aurangabad: औरंगाबादेत ओमिक्रॉनचा शिरकाव, इंग्लंड, दुबईहून आलेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः शहरात अखेर ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. औरंगाबादेत इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या आलेल्या दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह होते. त्यामुळे त्यांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे का, हे तपासण्यासाठी त्यांच्या स्वॅबचे नमूने पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबकडे पाठवण्यात आले होते. शनिवारी अखेर त्यांचे अहवाल प़ॉझिटिव्ह असल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

इंग्लंडहून आलेल्या कुटुंबातील वडील ओमिक्रॉनग्रस्त!

औरगंबादमध्ये लग्नसमारंभासाठी लंडनहून एक कुटुंब मुंबईत दाखल झाले होते. यातील तरुणीला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे मुंबईतच निदान झाले होते. त्यामुळे तिच्यावर तिथेच उपचार सुरु होते. मात्र कुटुंबातील वडील, आई आणि बहीण औरंगाबादेत होते. यातील वडिलांचा अहवाल सात दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना मेल्ट्रॉन रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅबचे नमूने ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ माजली आहे. तर दुबईहून आलेल्या आणखी एका रुग्णाचाही अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.

यंत्रणा अलर्ट, विलगीकरण कक्षात उपचार

या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना विलगीकरण कक्षात उपचार दिले जात आहेत. एका रुग्णावर खासगी रुग्णालयात तर एका रुग्णावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या-

Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितलं नेमकं गणित

Nagpur Corona | भीती कोरोनाची, आरोग्य सुविधांचा अभाव; मनपाने नेमके काय केले?