Nagpur Corona | भीती कोरोनाची, आरोग्य सुविधांचा अभाव; मनपाने नेमके काय केले?

नागपुरात ऑक्सिजन नसलेले बेड्‌स 16632, ऑक्सिजनची उपलब्धता असलेले बेड्‌स 9944 तर आय.सी.यू. बेड्‌सची संख्या 2807, आय.सी.यू. व्हेंटिलेटर बेड्‌सची संख्या 996 एवढी होती.

Nagpur Corona | भीती कोरोनाची, आरोग्य सुविधांचा अभाव; मनपाने नेमके काय केले?
कोरोनाच्या व्यवस्थेचा आढावा घेताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर दयाशंकर तिवारी.
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 3:56 PM

नागपूर : 2021 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने नावडते ठरले. फेब्रुवारी अखेरपासून वाढलेली रुग्णसंख्या आणि त्यातून हिरावलेले अनेकांचे नातलग या सरत्या वर्षाने एक कटू आठवण म्हणून नोंदविली गेली आहे. या सर्व परिस्थितीत शहराची पालकसंस्था म्हणून नागपूर महापालिकेने नागपूरकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व शर्थीचे प्रयत्न केले. शहरातील नागरिकांना कोरोना संसर्गाच्या धोक्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला.

वाढती रुग्णसंख्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचणीवर भर

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर 2021मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात दुसरी लाट आली. रुग्णसंख्या वाढू लागली. या काळात कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह चाचणीवर भर देण्यात आला. नागपूर महापालिकेद्वारे ठिकठिकाणी कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आली. नागरिकांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांनी चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन वारंवार मनपातर्फे करण्यात आले. मनपातर्फे चाचणीवर भर दिला गेला. त्यातून कोरोना रुग्णांचा पत्ता लावून त्यांचे उपचार करण्यात आले.

आपली बसने दिली रुग्णवाहिकेची सेवा

महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकारानं नागपूर महापालिकेच्या परिवहन सेवेमधील आपली बसच्या ताफ्यातील मिनी बसेसचे रुग्णवाहिकेमध्ये परिवर्तन करण्यात आले. केवळ 10 दिवसांत मनपाच्या 25 मिनी बस नि:शुल्क रुग्णवाहिकेची सेवा देण्यासाठी तैनात करण्यात आली. पुढे या रुग्णवाहिकांची संख्या वाढवून 65 करण्यात आली. रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय बसमधील वाहकांना मनपाच्या डॉक्टरांमार्फत ऑक्सिजन लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी परिवहन विभागामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याचे संपर्क क्रमांक प्रसारीत करण्यात आले. आरोग्य विभागावर आलेला ताण लक्षात घेता या रुग्णवाहिकेबाबत परिवहन विभागामध्ये वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली. नागरिकांना 24 तास रुग्णवाहिकेची सेवा मिळावी यासाठी वाहक व चालकांची प्रत्येकी 6 तासाची कामाची पाळी ठेवून त्यांचा खासगी कॅशलेस आरोग्य विमा मनपातर्फे काढण्यात आला.

राज्यात सर्वाधिक बेड्सची व्यवस्था नागपुरात

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाखांच्या तर शहराची लोकसंख्या 23 लाखांच्या घरात आहे. नागपूर जिल्हाच नव्हे तर नजिकच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सीमेवरील शहरांतील नागरिकही नागपूर शहरातील आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी येतात. कोरोना काळात हा ताण जास्त वाढला. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि तत्कालीन जिल्हाधिकारी रविन्द्र ठाकरे यांच्या नेतृत्वात रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टची व्यवस्था करण्यासोबतच बेड्‌सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. परिणामी नागपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलने प्रति दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या बेड्‌सची संख्या राज्यात सर्वाधिक होती. नागपुरात ऑक्सिजन नसलेले बेड्‌स 16632, ऑक्सिजनची उपलब्धता असलेले बेड्‌स 9944 तर आय.सी.यू. बेड्‌सची संख्या 2807, आय.सी.यू. व्हेंटिलेटर बेड्‌सची संख्या 996 एवढी होती.

Nagpur Crime| दहा दुचाक्या चोरल्या, एक पेटविली; कारण विचारताच पोलीसही चक्रावले

Nagpur Medical | मरावे परी कीर्तीरुपी उरावे! 82 वर्षीय ज्येष्ठाचं देहदान; मेडिकलच्या विद्यार्थ्यांना का हवंय मृत शरीर?

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.