नामांतराचं आंदोलन आता बास झालं, विरोध असेलच तर तुम्ही…; ठाकरे गटाने विरोधकांना थेट तंबीच दिली…

| Updated on: Mar 08, 2023 | 10:11 PM

चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना थेट इशारा देत तुमचा ता नामांतराला विरोध असेल तर तुम्ही थेट न्यायालयात जा असा सल्ला देण्यात आला आहे.

नामांतराचं आंदोलन आता बास झालं, विरोध असेलच तर तुम्ही...; ठाकरे गटाने विरोधकांना थेट तंबीच दिली...
Follow us on

छत्रपती संभाजीनगरः औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नावात बदल केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध दर्शवत आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यावरूनच ठाकरे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मी शिवसेनेचा वाघ असल्याचे सांगत इम्तियाज जलील यांनी आता आंदोलन मागे घ्यावे नाही तर त्यांनी थेट न्यायालयात जावे असा सल्ला त्यांना चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नाव केल्या नंतर एमआयएमकडून जोरदार आंदोलन पुकारण्यात आले. त्या आंदोलनात औरंगजेबचा फोटो लागल्याने हे वातावरण आणखी चिघळले आहे.

त्यानंतर या प्रकरणाची तक्रार ठाकरे गटाने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली. त्यानंतर आंदोलनातील तो औरंगजेबचा तो फोटोही काढून टाकण्यात आला.

तर आता चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना थेट इशारा देत तुमचा ता नामांतराला विरोध असेल तर तुम्ही थेट न्यायालयात जा असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि एमआयएमचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर एमआयएमने आंदोलन पुकारले. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेवर टीका करत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला.

तर एमआयएम शिवाय दुसऱ्या कोणत्याह पक्षाने या गोष्टीला विरोध दर्शवला नसला तरी आता एमआयएमकडून जाहीररित्या विरोध करण्यात येत असल्याने त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी थेट न्यायालयात जावे. विनाकारण नागरिकांमध्ये गैरसज पसरवू नये असा सल्लाही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.